एक्स्प्लोर
दिल्लीत विषारी धुरक्याचा कहर, घराबाहेर निघणंही कठीण
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढतच आहे. काल रात्री साडे दहा वाजता दिल्लीत आतापर्यंतच्या सर्वात घातक प्रदूषणाची नोंद करण्यात आली आहे. या प्रदूषणाने अजूनही दिल्लीकरांना श्वास घेणं कठीण झालं आहे.
दिवाळीनंतर सात दिवस उलटूनही दिल्लीला काळ्या धुरक्याचा विळखा पडला आहे. यामुळे सरकारी शाळा, कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिवाय घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला जाणकार देत आहेत.
'राईट टू ब्रिथ'साठी दिल्लीकर रस्त्यावर
आम्हालाही श्वास घेण्याचा अधिकार आहे, यासाठी सर्वसामान्य दिल्लीकर रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर प्रदूषणाविरोधात दिल्लीकर एकवटले आहेत.
दिल्लीतील ट्राफिक हे प्रदूषणाचं एकमेव कारण असू शकत नाही, असं पर्यावरण तज्ञांचं म्हणणं आहे. दिवाळीला सर्वाधिक फाटके दिल्लीत फोडण्यात आले. शिवाय पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये शेतात जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढत असल्याचं पर्यावरण तज्ञांचं मत आहे.
दरम्यान या सर्वांचा त्रास सर्वसामान्य दिल्लीकरांना होत आहे. विषारी धुरक्यामुळे दिल्लीतील रस्त्यांवर दिवसाही अंधार दिसत आहे.
संबंधित बातमी : दिल्लीवर विषारी धुरक्याची चादर, शाळा, कार्यालयांना सुट्टी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement