एक्स्प्लोर
VIDEO: पोलिस स्टेशनमध्ये अधिकाऱ्याला महिला होमगार्डचा मसाज
व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आरोपी अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

हैदराबाद : तेलंगणामध्ये एक पोलिस अधिकारी पोलिस स्टेशनमध्येच महिला होमगार्डकडून मसाज करुन घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
व्हिडिओत संबंधित महिला होमगार्ड खाकी साडी म्हणजे पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये दिसत आहे. तर पोलिस अधिकारी डोळे बंद करुन पहुडलेला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आरोपी अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
आरोपी हा गढवालमधील असिस्टंट सब इन्स्पेक्टर हसन असल्याची माहिती आहे.
https://twitter.com/ANI/status/930322352667164672
काही दिवसांपूर्वी हैदराबादमधूनही अशाच प्रकारचा व्हिडिओ समोर आला होता. त्यावेळी एक पोलिस अधिकारी युनिफॉर्मधारी पुरुष होमगार्डकडून मसाज करताना समोर आलं होतं.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सांगली
राजकारण
विश्व
Advertisement
Advertisement




















