एक्स्प्लोर

बेळगावात मराठा मोर्चाच्या संयोजकांवर पोलिसांची दडपशाही

बेळगाव : मराठा मोर्चाच्या आयोजकांना हेतुपुरस्सर त्रास द्यायचा निश्चयच पोलिसांनी केला आहे . शनिवारी मराठा मोर्चाचे संयोजक प्रकाश मरगाळे यांना खडेबाजार पोलीस स्थानकात विनाकारण बोलावून घेऊन दोन तास बसवून ठेवले. कार्यकर्ते आणि वकिलांनी पोलीस स्थानकाकडे धाव घेतल्यावर पोलिसांनी अखेर सोडून दिले. येनकेन प्रकारे दबावतंत्राचा वापर मराठा मोर्चाच्या कार्यकर्ते आणि संयोजकांवर करायचा असे धोरण पोलिसांनी अवलंबल्याचे दिसत आहे. यापूर्वी देखील मराठा मोर्चाच्या संयोजकांकडून पाच लाखाचे हमीपत्र  घेतले गेले आहे. 'मी बेळगावचा ,बेळगाव महाराष्ट्राचे' असे लिहिलेले टी-शर्ट विकण्यास तुम्हीच परवानगी दिल्याची माहिती मिळाली आहे आणि त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे खडेबाजार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी यांनी सांगितले. "आपण फक्त साहित्याची विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. ते कोणते साहित्य विकत आहेत याची माहिती नाही. शुक्रवारी 'मी बेळगावचा ,बेळगाव महाराष्ट्राचे' याला आक्षेप पोलिसांनी घेतल्यावर स्टिकर आणि पोस्टरवर लिहिलेला मजकूर काढण्यात आला आहे. अटक करून हिंडलगा जेलला पाठवणार तर पाठवा", अशी भूमिका प्रकाश मरगाळे यांनी घेतली. तोपर्यंत कार्यकर्ते आणि वकील मंडळी पोलीस स्थानकात दाखल झाली. त्यामुळे पोलीस उपायुक्त येऊन तुमच्याशी बोलणार आहेत, तुम्हाला नोटीस द्यायची आहे असे सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी मरगाळे यांच्याकडून लेखी हमीपत्र घेऊन सोडून दिले. यावेळी पोलीस स्थानकात माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, वकील महेश बिर्जे, रमेश पावले आणि राजू मरवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसखाते करत असलेल्या दडपशाहीचा निषेध मुंबई येथील शिवाजी मंदिरमध्ये झालेल्या सकल मराठी मोर्चाच्या बैठकीत करण्यात आला. आजवर मराठा क्रांती मोर्चा शांततेत निघाले आहेत. मोर्चावेळी दंगा, हुल्लडबाजी झाल्याचे एकही उदाहरण नाही. असे असताना दडपशाही करणे चुकीचे आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे आम्ही पालन करू. नियमभंग मोर्चाच्या आयोजकांकडून होणार नाही, अशी ग्वाही सकल मराठा मोर्चाचे संयोजक दिलीप पाटील यांनी मुंबईहून बोलताना दिली.

महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करावे की चांदी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या 3 गोष्टी, सध्या काय आहेत दर? 
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करावे की चांदी? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या 3 गोष्टी, सध्या काय आहेत दर? 
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
PNB Bank Fraud : एक नाही दोन नाही बँकेतून तब्बल 35 कोटी रुपये गायब, ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी, नेमकं प्रकरण काय? 
PNB Bank Fraud : एक नाही दोन नाही बँकेतून तब्बल 35 कोटी रुपये गायब, ग्राहकांची बँकेत मोठी गर्दी, नेमकं प्रकरण काय? 
कचरा आणून द्या, चहा, कॉफी आणि जीवनावश्यक वस्तू मिळवा, भारतातील 'या' शहरात अनोखा प्रयोग, लोकांचा वाढता प्रतिसाद
कचरा आणून द्या, चहा, कॉफी आणि जीवनावश्यक वस्तू मिळवा, भारतातील 'या' शहरात अनोखा प्रयोग, लोकांचा वाढता प्रतिसाद

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Embed widget