एक्स्प्लोर

तीन वर्षांपूर्वीच पीएनबी घोटाळा रोखला जाऊ शकत होता!

एका अशा व्यक्तीने हा दावा केला आहे, ज्याने पीएमओला चिठ्ठी लिहून सांगितलं होतं की, मेहुल चोक्सी बँकांकडून कर्ज घेऊन देशाला कसा लुटत आहे.

नवी दिल्ली : तीन वर्षांपूर्वी चौकशी सुरु केली असती, तर पंजाब नॅशनल बँकेतील साडे अकरा हजार कोटी रुपयांचा घोटाळा रोखला जाऊ शकत होता. एका अशा व्यक्तीने हा दावा केला आहे, ज्याने पीएमओला चिठ्ठी लिहून सांगितलं होतं की, मेहुल चोक्सी बँकांकडून कर्ज घेऊन देशाला कसा लुटत आहे. वैभव खुरानिया या व्यक्तीने याबाबत खुलासा केला आहे. वैभव खुरानियालाही मेहुल चोक्सीचा वाईट अनुभव आला आहे. त्यांनी 2013 साली मेहुल चोक्सीचा ब्रँड गीतांजलीची फ्रँचायझी घेतली होती. त्यासाठी जवळपास दीड कोटी रुपयांची गुंतवणूकही केली. मात्र गीतांजली ब्रँडची जी ज्वेलरी मिळाली, ती अत्यंत खराब दर्जाची होती. तक्रार केल्यानंतर गीतांजलीने वैभव यांच्याकडून ज्वेलरी परत घेतली, मात्र मोबदल्यात एक रुपयाही दिला नाही. ज्यामुळे त्यांना आपलं स्टोअर बंद करावं लागलं. त्यानंतर वैभव खुरानियांनी 2015 मध्ये पीएमओकडे तक्रार केली होती. मात्र या तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेली नाही. 2016 मध्ये कोर्टाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला होता. पीएमओला पत्र तर लिहिलंच होतं. मात्र सीबीआय, सेबी आणि ईडीला याबाबत माहिती दिली होती. त्यावेळीच जर कारवाई केली असती तर मेहुल चोक्सी फरार होऊ शकला नसता. हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर पोहोचलंच नाही, असंही वैभव खुरानिया म्हणाले. पीएनबीची मुंबई ब्रांच सील साडे अकरा हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे संशयाच्या घेऱ्यात सापडलेली पीएनबीची मुंबईतील ब्रीच कँडी ब्रांच सीबीआयने सील केली आहे. या बँकेत आता कर्मचारीही येणार नाहीत. एवढा मोठा घोटाळा कसा करण्यात आला, याची चौकशी आता सीबीआयकडून करण्यात येणार आहे. घोटाळ्यासंबंधित सर्व कागदपत्र तपास यंत्रणांना सोपवले पीएनबी घोटाळ्यासंबंधित सर्व कागदपत्र तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आले आहेत. यूपीए आणि एनडीए या दोन्हीही सरकारने या घोटाळ्याला गांभीर्याने घेतलं नाही. परिणामी साडे अकरा हजार कोटींचा घोटाळा झाला. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी दोघेही सध्या फरार आहेत. संबंधित बातम्या :

पीएनबी घोटाळा : छोटे मासे गळाला, 3 आरोपींना 14 दिवसांची CBI कोठडी

PNB चा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक गोकुळनाथसह तिघांना अटक

PNB घोटाळा : 5 हजार कोटींचा गैरव्यवहार एनडीएच्या काळात

PNB घोटाळा : नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे पासपोर्ट रद्द

पीएनबी घोटाळा : अकरा हजार कोटी परत कसे मिळणार?

PNB घोटाळा : लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय?

PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळाले

पीएनबी घोटाळा : डायमंड किंग नीरव मोदीवर गुन्हा दाखल

महत्त्वाच्या बातम्या

कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Crime News: पाय बांधले, गळा कापला अन् डोक्यात वार..., वाराणसीत प्रियकराच्या भाड्याच्या खोलीत सापडला प्रेयसीचा कुजलेला मृतदेह, पोस्‍टमॉर्टम रिपोर्टमध्ये चक्रावणारी माहिती समोर
पाय बांधले, गळा कापला अन् डोक्यात वार..., वाराणसीत प्रियकराच्या भाड्याच्या खोलीत सापडला प्रेयसीचा कुजलेला मृतदेह, पोस्‍टमॉर्टम रिपोर्टमध्ये चक्रावणारी माहिती समोर

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Embed widget