एक्स्प्लोर

PNB घोटाळा : विपुल अंबानीसह 5 जणांना सीबीआयची अटक

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात आतापर्यंत 11 जणांना बेड्या ठोकण्यात यश आलं आहे.

मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मुकेश अंबानींचे नातेवाईक विपुल अंबानीसह पाच जणांवर सीबीआयने कारवाई केली. आतापर्यंत 11 जणांना बेड्या ठोकण्यात यश आलं आहे. फायरस्टार इंटरनॅशनल डायमंड्स ग्रुपचा अध्यक्ष विपुल अंबानी याच्यासोबत तीन फर्म्सच्या कार्यकारी सहाय्यक कविता मणकिकर, फायरस्टार ग्रुपचा वरिष्ठ अधिकारी अर्जुन पाटील, नक्षत्र आणि गीतांजली ग्रुपचा सीएफओ कपिल खंडेलवाल आणि गीतांजली ग्रुपचा व्यवस्थापक नितेन शाही यांना अटक करण्यात आली. यापूर्वी पीएनबीच्या मुंबईतील ब्रिच कँडी ब्रँचचा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक (डेप्युटी ब्रँच मॅनेजर) गोकुळनाथ शेट्टी, सिंगल विंडो ऑपरेटर मनोज खराज आणि निरव मोदी ग्रुप ऑफ फर्म्सचा अधिकृत स्वाक्षरीकर्ता (ऑथराईज्ड सिग्नेटरी) हेमंत भट याला अटक करण्यात आली आहे. नीरव मोदीच्या उलट्या बोंबा हे प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे पीएनबीने कर्ज वसुलीचे सर्व मार्ग बंद केले आहेत, असं नीरव मोदीने पत्र लिहून म्हटलं आहे. देशातला सर्वात मोठा कर्ज घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीने उलट्या बोंबा ठोकणं सुरु केलं आहे. पीएनबीने आपल्या कंपन्यांवर असलेलं कर्ज वाढवून सांगितलं असल्याचा दावाही नीरव मोदीने केला आहे. पीएनबीला 15-16 फेब्रुवारीला पत्र लिहिण्यात आलं. आपल्या कंपन्यांवर पीएनबीचं कर्ज 5 हजार कोटींपेक्षा कमी आहे, असाही दावा नीरव मोदीने केला आहे. ”चुकीच्या पद्धतीने कर्जाची आकडेवारी सांगितल्यामुळे माध्यमांमध्ये हे प्रकरण गेलं आणि चौकशी सुरु झाली. परिणामी कामही बंद झालं. प्रकरण सार्वजनिक झाल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. आता बँकेचं कर्ज चुकतं करण्याची आमची क्षमताही धोक्यात आली आहे,” असं नीरव मोदीने म्हटलं आहे. नीरव मोदी त्याच्या कुटुंबीयांसह जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच देश सोडून पळाला होता. बँकेने कर्जाची रक्कम वसूल करण्याच्या घाईत माझ्या ब्रँडचा व्यवसाय उद्ध्वस्त केला आहे आणि आता कर्ज वसूल करण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत, असं नीरव मोदीने बँकेला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. ”पत्नीचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, तरीही तिचं नाव यामध्ये चुकीच्या पद्धतीने ओढण्यात आलं आहे. मामा मेहुल चोक्सीचं नावही तक्रारीत चुकीच्या पद्धतीने देण्यात आलं आहे. कारण, त्याचा व्यवसाय वेगळा आहे आणि आमचा काहीही संबंध नाही. त्या सर्वांना माझ्या बँकेतील व्यवहारांविषयी काहीही माहिती नाही,” असाही दावा नीरव मोदीने केला आहे. दरम्यान, 2200 कर्मचाऱ्यांचं वेतन सध्याच्या खात्यातून देण्याची परवानगी देण्यात यावी, असंही नीरव मोदीने पत्राच्या शेवटी म्हटलं आहे. कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यासाठी नीरव मोदीने बँकेला विनंती केली आहे.

संबंधित बातम्या :

नीरव मोदीकडून 2 हजारांच्या हिऱ्याची 50 लाखांना विक्री?

या सर्व घोटाळ्यांमध्ये बँकेतील तुमचा पैसा किती सुरक्षित आहे?

पीएनबीच्या तीन विभागांमध्ये समन्वय नसल्याने घोटाळा?

पीएनबीने प्रकरण सार्वजनिक केल्याने देणं देऊ शकत नाही : नीरव मोदी

नीरव मोदीकडे बँकेचे सिक्रेट पासवर्डही होते?

पीएनबी घोटाळा 20 हजार कोटींवर जाण्याची शक्यता

पीएनबी घोटाळा : छोटे मासे गळाला, 3 आरोपींना 14 दिवसांची CBI...

PNB चा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक गोकुळनाथसह तिघांना अटक

PNB घोटाळा : नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे पासपोर्ट रद्द

नीरव मोदीच्या संपत्तीवर ईडीची टाच, 5 हजार कोटींचे हिरे जप्त

PNB घोटाळा : दोषी कर्मचारी निलंबित, एमडी मेहतांची माहिती

PNB घोटाळा : लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय?

PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळाले

पीएनबी घोटाळा : डायमंड किंग नीरव मोदीवर गुन्हा दाखल

पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील शाखेत 11 हजार कोटींचा गैरव्यवहार

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget