एक्स्प्लोर
Advertisement
गेल्या वर्षीच्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं.
नवी दिल्ली: देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं.
यावेळी त्यांनी शेतकरी ते विद्यार्थी, दहशतवाद ते काश्मीरची समस्या, ट्रिपल तलाक ते एकीचं बळ, डिजिटल इंडिया ते न्यू इंडिया अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
1) नोटाबंदीनंतर जवळपास 3 लाख कोटी रुपये परत आले, नोटाबंदीनंतर देशातील 3 लाख कंपन्यांचं हवाला रॅकेट उद्ध्वस्त, 1 लाख नवे करदाते तयार
2) गेल्या वर्षी 22 लाख आयकरदाते होते, त्यांची संख्या यंदा 56 लाखांवर पोहोचली
3) संपूर्ण देशभरात ट्रिपल तलाकविरोधात आंदोलन सुरु आहे. ज्या माझ्या बहिणी याविरोधात लढत आहेत, त्यांचं अभिनंदन
4) 'गाली से ना गोली से', 'परिवर्तन होगा हर कश्मिरी को गले लगाने से'. ‘भारत जोडो’चा नारा, धार्मिक-जातीयवाद संपायला हवा. मूठभर फुटीरतावाद्यांमुळे शांततेचा भंग होऊ देऊ नका न्यू इंडियासाठी 'टीम इंडिया'ने एकत्र येण्याची गरज : पंतप्रधान मोदी
5) सर्जिकल स्ट्राईकवेळी भारताची ताकद सर्वांनी मान्य केली. सरकारने जवानांसाठी काही केलं, तर देशासाठी लढण्यासाठी त्यांचं मनोबल आणखी वाढतं. वन रँक वन पेन्शनचा प्रश्न सरकारने मार्गी लावला.
6) आस्थेच्या नावे हिंसा नको. विविध आंदोलनात सरकारी संपत्तीचं नुकसान केलं जातं,ती सरकारची नाही, जनतेची संपत्ती आहे.
7) दहशतवादाविरोधी लढ्यासाठी अनेक देश भारतासोबत आहेत. दहशतवाद कधीही खपवून घेतला जाणार नाही
8) लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली त्याचं हे 125 वं वर्ष आहे. सुदर्शन चक्रधारी मोहन ते चरखाधारी मोहन ही आपली संस्कृती
9) मातीतून सोनं पिकवण्याची धमक शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतीसाठी आम्ही 99 योजना आणल्या. त्यापैकी 21 योजना सुरु झाल्या आहेत. 50 योजना लवकरच पूर्ण होतील. शेतकऱ्यांना 'बीज से बाजार' तक सुविधा उपलब्ध करून देणार
10) न्यू इंडियाचा संकल्प घेऊन पुढे जायचंय. 21 व्या शतकात जन्म घेणाऱ्यांसाठी 2018 हे वर्ष निर्णायक असेल. न्यू इंडिया सामर्थ्यशाली, सुरक्षित आणि जगभरात भारताचा दबदबा असणारा असेल
संबंधित बातम्या
‘ना गाली से, ना गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से’
नोटाबंदीनंतर 3 लाख कंपन्यांचं हवाला रॅकेट उद्ध्वस्त : पंतप्रधान मोदी
न्यू इंडियासाठी 'टीम इंडिया'ने एकत्र येण्याची गरज : पंतप्रधान मोदी
शेतकऱ्यांना 'बीज से बाजार' तक सुविधा देणार: मोदी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement