एक्स्प्लोर

G-7 Summit : पंतप्रधान मोदी आजपासून जर्मनी आणि यूएई दौऱ्यावर, शिखर संमेलनात होणार सहभागी

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी7 शिखर परिषदेत (G-7 Summit) सहभागी होण्यासाठी जर्मनीच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.

PM Modi Germany and UAE Visit : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 26 जून ते 28 जूनदरम्यान जर्मनी (Germany) आणि संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री मोदी जर्मनीमध्ये जी-7 शिखर संमेलनात (G-7 Summit) सहभागी होणार आहेत. यासह ते माजी राष्ट्रपती आणि अबू धाबीचे शासक शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यासाठी यूएईचा दौरा करतील. याआधी 2 मे रोजी पंतप्रधान जर्मनीच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी जर्मनीचे चान्सलर (German Chancellor) ओलाफ स्कोल्स यांनी पंतप्रधान मोदी यांना जी 7 शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिलं.

जर्मनीच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या शिखर परिषदेला हजेरी लावत पंतप्रधान मोदी जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्या निमंत्रणावरून श्लोस एलमाऊला (Schloss Elmau) भेट देतील. या परिषदेदरम्यान पंतप्रधान पर्यावरण, ऊर्जा, हवामान, अन्न सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता आणि लोकशाही या विषयांवर आपले विचार मांडतील अशी अपेक्षा आहे. या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून परिषदेसाठी अर्जेंटिना, इंडोनेशिया, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या इतर लोकशाही देशांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे.

पंतप्रधानांची सहभागी देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा
G7 शिखर परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी काही सहभागी देशांतील नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. भारत आणि जर्मनी यांच्यातील मजबूत आणि घनिष्ठ संबंधांमुळे G7 शिखर परिषदेसाठी भारताला निमंत्रण देण्यात आलं आहे. 

युएईच्या शासकाच्या निधनावर शोक व्यक्त करणार आहेत
G7 शिखर परिषदेनंतर पंतप्रधान मोदी 28 जून रोजी संयुक्त अरब अमिरातीला (UAE) भेट देणार आहेत. येथे ते संयुक्त अरब अमिरातीचे माजी राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतील. युएईचे नवे अध्यक्ष आणि अबुधाबीचे शासक म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचं अभिनंदन करतील. पंतप्रधान मोदी 28 जून रोजी रात्री संयुक्त अरब अमिरातीहून भारतासाठी रवाना होतील.

भारतीय वेळेनुसार पंतप्रधान मोदी यांचं जर्मनी येथील वेळापत्रक

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी रात्री 12 वाजता जर्मनीसाठी रवाना झाले
  • रविवारी सकाळी 8.45 वाजता म्युनिक विमानतळावर उतरतील.
  • सकाळी 9.35 ला हॉटेलला पोहोचतील.
  • सायंकाळी 6.30 वाजता सामुदायिक कार्यक्रमात ऑडी डोममध्ये सहभागी होतील.
  • रात्री 9.30 वाजता अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट
  • दुपारी 11.30 वाजता बव्हेरियाच्या अध्यक्षांची भेट

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

संपूर्ण फास्टॅगमुळं देशाला 25 हजार कोटींचा फायदा मिळणार, वाहनांच्या रांगा कमी होणार, नेमकं काय म्हणाले गडकरी? 
संपूर्ण फास्टॅगमुळं देशाला 25 हजार कोटींचा फायदा मिळणार, वाहनांच्या रांगा कमी होणार, नेमकं काय म्हणाले गडकरी? 
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठी संधी! सोन्या चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठी संधी! सोन्या चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं

व्हिडीओ

Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime News: मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
मुलाला जादूटोण्याने मारल्याचा संशय; सासऱ्याने सूनेला डोक्यात कुऱ्हाड टाकून संपवलं, नंतर स्वत: विहिरीत... नागपूरमधील धक्कादायक घटना
Sanjay Gaikwad: 'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
'बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?' असं विधान करणे आमदार संजय गायकवाडांना भोवलं; महिलेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल
India China Summit : भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
भारत-चीनमध्ये 7 महत्त्वाचे करार! PM मोदी आणि शी जिनपिंग यांच्या महाबैठकीने बदललणार जगाचे समीकरण
Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
'गोकुळ' निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट; अवसायनातील 492 संस्थांच्या पात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Zomato: तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
तर आता ₹5 ते ₹20 अधिक द्यावे लागणार! झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करणं महागलं
BRICS Summit: दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
दिल्ली BRICS मधील जाहीरनामा एकमताने मंजूर; दिल्ली जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?
Maharashtra Rain news: गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत धो-धो पाऊस, वसई-विरारमध्ये पावसाचा कहर
गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत धो-धो पाऊस, वसई-विरारमध्ये पावसाचा कहर
Donald Trump : नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...कॅनडाबाबत म्हणाले...
नवी दिल्लीत नरेंद्र मोदी, व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग एकत्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मोठ्या निर्णयाचे संकेत...
Embed widget