वय झालं असलं तरी नरेंद्र मोदी आणखी स्ट्रॉंग, ते चौथ्यांदा पंतप्रधान होणार, रामदास आठवलेंचं वक्तव्य, म्हणाले, ते देवाचा अवतार नाहीत पण...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वय झालं असलं तरी ते स्ट्रॉंग आहेत. त्यामुळं ते चौथ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं.
Ramdas Athawale : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वय झालं असलं तरी ते स्ट्रॉंग आहेत. त्यामुळं ते चौथ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. विरोधकांना वादंग उठवल्याशिवाय दुसरं काही काम राहिलेलं नाही. विरोधकांची ताकद छिन्ह झालेली आहे. त्यांच्यामध्ये आता एकजूट राहिलेली नाही असेही आठवले म्हणाले.
पुढच्या निवडणुकीला ठाकरेंचे चार आमदार येतील की नाही? हे सांगता येत नाही
आगामी निवडणूक पर्यंत उद्धव ठाकरेंचा शिवसेना हा पक्ष राहणार नाही असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राहतील, मात्र पक्ष तेवढा स्ट्रॉंग राहणार नाही. उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले असते तर एकनाथ शिंदे यांची घटना घडली नसती, सध्या 20 आमदार आहेत. मात्र पुढच्या निवडणुकीला चार आमदार येतील की नाही? हे सांगता येत नाही. आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होण्याचा संबंधच येत नाही असेही आठवले म्हणाले.
राज ठाकरेंच्या या भूमिकेशी आम्ही सहमत
मनसे विरोधात उत्तर भारतीयांची भूमिका आणि मनसेची मराठी संदर्भात भूमिका यावरही आठवलेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठी बोललं पाहिजे, मराठी शिकलं पाहिजे. राज ठाकरेंच्या या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. मात्र दबाव आणून मराठी बोलण्यास भाग पाडणे अशी दादागिरी योग्य नाही, असं म्हणणं म्हणजे आपली इकॉनोमी कॉलॲप्स करण्यासारखं आहे, बँका उध्वस्त करण्यासारख आहे असेही आठवले म्हणाले. नितेश राणे यांची भूमिका ही पक्षाची नसून ती व्यक्तिगत आहे, भाजपाची भूमिका ही मुस्लिम विरोधी नाही असेही आठवले म्हणाले.
मोदी देवाचा अवतार नाहीत, ते मानवाचाच अवतार
नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार आहेत असं वक्तव्य कंगना राणावत यांनी केलं होतं. यावर बोलताना आठवले म्हणाले की, मोदी देवाचा अवतार आहेत असं मला वाटत नाही. ते मानवाचाच अवतार आहेत. जगभरातील पंतप्रधान यांच्या झालेल्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांना 80 टक्के लोकांनी पसंती दिल. ते अतिशय स्ट्रॉंग पंतप्रधान आहेत. जगातील लोकप्रिय नेते म्हणून त्यांचं नाव आहे, मात्र ते देवाचा अवतार आहेत, या मताशी मी सहमत नाही असे आठवले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
























