सामान्य नागरिकाप्रमाणे मोदींची रकाबगंज गुरुद्वाराला भेट, गुरु तेगबहादूर यांच्या समाधीसमोर नतमस्तक
शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांनी 17 व्या शतकात शीख धर्माचा प्रचार केला. मुघल शासक औरंगजेबाच्या आदेशानुसार त्यांची हत्या करण्यात आली होती. ते ज्या मातीत विसावले त्याच ठिकाणी गुरुद्वारा रकाबगंज उभा आहे
नवी दिल्ली: गेल्या सहा वर्षाच्या काळात पंतप्रधान मोदींनी अनेक सरप्राईज दिले आहेत. रविवारीही त्यांच्या अशाच एका सप्राईज भेटीची चर्चा सुरु झाली. अगदी सामान्य नागरिकाप्रमाणे पंतप्रधान मोदी अचानक दिल्लीतल्या गुरुद्वारा रकाबंगजमध्ये पोहचले. इथं शीखांचे गुरु तेगबहादूर यांची समाधी आहे. मोदी त्या समाधीसमोर नतमस्तक झाले. एकीकडं दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात शीख समुदाय सर्वात अग्रस्थानी आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी या भेटीतून काय संदेश द्यायचा प्रयत्न करतायत याची चर्चा सुरु झालीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या सरप्राईज भेटीमुळे गुरुद्वारा प्रबंधन कमिटीच्या लोकांनाही धक्का बसला. मोदींच्या या भेटीसाठी ना कोणती सुरक्षा होती ना रस्त्यावर कोणते बॅरिकेट्स लावण्यात आले होते. डोक्यावर केशरी पगडी घालून आणि केशरी कुर्ता परिधान करुन मोदी या ठिकाणी पोहचले. सुरक्षेचा बडेजाव दूर करत, सामान्यांना कुठलाही अटकाव होऊ न देता अगदी सामान्य नागरिकाप्रमाणे मोदींनी तेगबहादूराच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर मोदींनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या.
आज सुबह मुझे ऐतिहासिक गुरुद्वारा रकाबगंज साहिब में मत्था टेकने का सौभाग्य मिला, जहां श्री गुरु तेग बहादुर जी के पार्थिव शरीर का अंतिम संस्कार किया गया था। दुनियाभर के लाखों लोगों की तरह श्री गुरु तेग बहादुर जी के विचार और जीवन मुझे सदैव प्रेरित करते हैं। pic.twitter.com/MyrFnSLbOf
— Narendra Modi (@narendramodi) December 20, 2020
गुरु साहिब की यह विशेष कृपा है कि हमारी सरकार के कार्यकाल के दौरान ही हमें श्री गुरु तेग बहादुर जी के 400वें प्रकाश पर्व को मनाने का अवसर मिल रहा है। आइए, इस पावन मौके को ऐतिहासिक बनाएं और श्री गुरु तेग बहादुर जी के आदर्शों को अपने जीवन में अपनाएं। pic.twitter.com/fXxVRUU1yI
— Narendra Modi (@narendramodi) December 20, 2020
कोण होते गुरु तेगबहादूर? गुरु तेगबहादूर हे शीखांचे नववे गुरु आहेत. आपल्या कार्यकालात त्यांनी शीख धर्माचा प्रचार केला. शनिवारी त्यांचा 345 वा शहीदी दिवस होता. 17 व्या शतकात मुघल शासक औरंगजेबाच्या आदेशानुसार त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी गुरु तेगबहादूर यांनी धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी हसत-हसत आपल्या प्राणांची आहुती दिली. गुरु तेगबहादूर ज्या मातीत विसावले त्याच ठिकाणी गुरुद्वारा रकाबगंज उभा आहे. दरवर्षी त्यांच्या शहीदी दिवसाचे स्मरण केलं जातं. या वर्षी शनिवारी (19 डिसेंबर) रोजी त्यांचा शहीदी दिवस साजरा केला गेला.
शेतकरी आंदोलनाची धग सर्वात जास्त पंजाब-हरियाणात आहे. अशा वेळी पंतप्रधानांनी गुरुद्वाराला भेट देऊन काय संदेश देण्याचा प्रयत्न केलाय याची चर्चा सुरु झाली आहे. मोदींच्या या भेटीतून काय साध्य होईल हे पाहणेही औत्सुक्याचं ठरेल.
पहा व्हिडिओ: PM Modi | सुरक्षा ताफ्याशिवाय पंतप्रधान मोदी गुरुद्वारात; गुरु तेगबहाद्दर यांना वाहिली श्रद्धांजली
संबंधित बातम्या: