एक्स्प्लोर
वर जाऊन बाळासाहेबांना उत्तर देईन, मोदींनी शिवसेनेला सुनावलं

नवी दिल्ली : मी जेव्हा वर जाईन, तेव्हा बाळासाहेबांना ठामपणे सांगू शकेन की मी चांगलं काम करुन आलो आहे, तुमची हिंमत होईल का माहित नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटीला आलेल्या शिवसेना खासदारांना सुनावलं आहे.
नोटाबंदीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना खासदारांचं शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीला दाखल झालं होतं. त्यावेळी झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी खासदारांना चांगलंच फैलावर घेतलं. 'मी जेव्हा वर जाईन, तेव्हा बाळासाहेबांना ठामपणे सांगू शकेन, की मी चांगलं काम करुन आलो आहे, तुमची हिंमत होईल का माहित नाही. तुम्ही कितीही विरोध केलात, तरी तुम्हाला आमच्याबरोबरच यायचं आहे.' असंही मोदी म्हणाले.
नोटबंदीच्या प्रश्नावर शिवसेना खासदार पंतप्रधानांच्या भेटीला
नोटाबंदीवर शिवसेनेचं तळ्यात-मळ्यात सुरुच आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंनी काहीच दिवसांपूर्वी नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं, तर दुसरीकडे शिवसेना खासदारांनी भाजपविरोधात दंड थोपटले. जिल्हा बँकांवरील निर्बंधाविरोधात शिवसेना खासदार मोदींच्या दरबारी दाखल झाले. मोदींच्या बैठकीत मार्ग निघाला नाही तर संसदेत मोदींविरोधात आक्रमक होण्याचा मंत्र उद्धव ठाकरेंनी दिला होता. शिवसेनेनं एकीकडे नोटाबंदीचं स्वागत केलं असलं तर दुसरीकडे चलनतुटवड्याच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. शिवसेना सत्तेत असतानाही तृणमूलने काढलेल्या नोटाबंदी विरोधातल्या मोर्च्यातही सहभागी झालेली पाहायला मिळाली होती.संबंधित बातम्या :
शिवसेनेचा टोन आजकाल बिघडला आहे, दानवेंच्या कानपिचक्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
