PM Modi : पंतप्रधान मोदींनी दिला स्वच्छतेचा मंत्र, हाती झाडू घेत स्वच्छता सेवेत श्रमदान करत 'बापूं'ना आदरांजली
PM Modi Cleanliness Campaign Before Gandhi Jayanti : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुस्तीपटू अंकित बैयनपुरियासोबत श्रमदान केलं. पंतप्रधानांनी महात्मा गांधींना आदरांजली अर्पण केली आहे.
Cleanliness Campaign : राष्ट्रपिता महात्मा गांधी (Gandhi Jayanti) यांच्या 2 ऑक्टोंबरला असणाऱ्या जयंतीच्या 154 व्या पार्श्वभूमीवर आज, रविवारी (1 ऑक्टोबर) देशभर स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. देशभरात स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत श्रमदान केलं जात आहे. या स्वच्छता अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कुस्तीपटू अंकित बैयनपुरियासोबत श्रमदान केलं. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी आणि कुस्तीपटूअंकित बैयनपुरिया स्वच्छ आणि स्वस्थ भारताचा संदेश देत आहेत.
पंतप्रधान मोदींकडून स्वच्छता अभियानाला हातभार
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी आज स्वच्छता मोहिमेला हातभार लावून देशवासियांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे.
VIDEO | PM Modi interacts with Ankit Baiyanpuriya as the wrestler takes part in the cleanliness drive 'Swachhata Pakhwada' with him.
— Press Trust of India (@PTI_News) October 1, 2023
(Source: Third Party) pic.twitter.com/SKVswdIxOC
एक तारीख, एक तास, एक साथ
सप्टेंबरच्या 'मन की बात' कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहन केलं होतं. यावेळी त्यांनी ''1 तारीख, 1 तास, एक साथ'' असा नारा दिला होता. श्रमदानासाठी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आवाहन केलं. यावेळी ते म्हणाले- स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे आणि प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे. आजच्या मोहिमेसाठी देशभरातील 6.4 लाख ठिकाणे निवडण्यात आली आहेत.
दरवर्षी स्वच्छ भारत अभियान
पंतप्रधान मोदी 2014 मध्ये जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी गांधी जयंतीनिमित्ताने 2 ऑक्टोबर रोजी 'स्वच्छ भारत' अभियान सुरू केलं. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत जनतेला त्यांच्या आजूबाजूच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यातं आवाहन केलं होतं. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छता ठेवण्यासोबतच सर्वत्र स्वच्छता ठेवून पर्यावरणाचे रक्षण करावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींकडून करण्यात आलं होतं. त्यानंतर दरवर्षी गांधी जयंतीनिमित्त देशभरात 'स्वच्छ भारत' अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.