एक्स्प्लोर
Clean Chit Politics: 'देवेंद्र फडणवीसांनी ‘येथे क्लीन चिट मिळेल’ असा बोर्ड लावावा'; सुषमा अंधारेंचा घणाघात
शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या प्रकरणात त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. 'माननीय मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीत बसू नये, तो त्यांचा जॉब नाही. त्यांनी आपल्या कार्यालयाच्या बाहेर बोर्ड लावावा की येथे क्लीन चीट वाटून मिळतील,' असा थेट टोला अंधारेंनी फडणवीसांना लगावला. डॉ. मुंडे यांच्या चार पानी पत्रातील 'निरीक्षक' शब्दाची वेलांटी आणि हातावरील सुसाईड नोटमधील वेलांटी यात फरक असल्याचे सांगत, अंधारेंनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय गडद केला आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या समितीमार्फत चौकशी व्हावी आणि रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी बीडमध्ये काही तरुण BSNL टॉवरवर चढून आंदोलन करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement
















