PM Modi Yoga Video: पंतप्रधान मोदींच्या विविध योगासनाचे अॅनिमेशन शेअर, व्हिडीओ पाहून तुम्हीही करु शकता योगा
International Yoga day: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योगासनांचे चित्रण असलेले 16 व्हिडीओ शेअर केले आहेत.
International Yoga day: येत्या 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने जगभरात योगाच्या विषयी जागरुकता वाढवण्यात येते, तसेच आपल्याला तणावमुक्त जीवन जगायचं असेल तर योग किती आवश्यक आहे, त्याचे महत्व सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अॅनिमेशनमधील 16 व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.
या व्हिडीओमध्ये योगाचे विविध आसन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करायचे याची माहिती दिली आहे. यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं आहे. "योग हे शरीर आणि मन दोन्हीसाठी लाभदायक आहे. योग शरीर बळकट करण्याबरोबर ते लवचिक बनवते आणि मनाची शांतता वाढवते. चला, आपण योग आपल्या जीवनाचा एक भाग बनवू या आणि भविष्यात निरामय आरोग्य तसेच मन:शांती मिळवूया. विविध आसनांचे चित्रण केलेली चित्रफीत शेअर करत आहे." असं मोदींनी यामध्ये म्हटलं आहे.
आपण जर योगा करणार असाल तर खालील व्हिडीओ पाहून ते करु शकता.
वृक्षासन
ताडासन
त्रिकोणासन
अर्धचंद्रासन
पादहस्तासन
भद्रासन
उष्ट्रासन
वज्रासन
शशांकासन
वक्रासन
भुजंगासन
शलभासना
पवनमुक्तासन
सेतू बंधासन
नाडी शोधन प्राणायाम
ध्यान