एक्स्प्लोर
Advertisement
अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त 100 रुपयांचे नाणे जारी
दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी 100 रुपयांचे नाणे जारी केले आहे.
नवी दिल्ली : दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी 100 रुपयांचे नाणे जारी केले आहे. वाजपेयींच्या जयंतीच्या एक दिवस आधी पंतप्रधांनांनी या नाण्याची घोषणा केली. 16 ऑगस्ट रोजी वाजपेयींचे निधन झाले. त्यांच्या आठवणी कायम रहाव्यात यासाठी मोदींनी वाजपेयींची प्रतिमा असलेले 100 रुपयांचे नाणे जारी केले आहे.
संसदेत आयोजित कार्यक्रमात मोदी म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयींनी पक्षाच्या विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही. अटलजींनी राजकीय प्रवासातील जास्त काळ विरोधी पक्षाच्या बाकावर घालवला असून त्यांनी नेहमी राष्ट्र हिताचाच विचार केला. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजप अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते.
कसे आहे 100 रुपयांच नाणे?
100 रुपयांच्या या नाण्यावर पुढील भागात अशोक स्तंभ आणि त्याच्या खाली सत्यमेव जयते असे लिहले आहे. नाण्यावर देवनागरीमध्ये भारत आणि रोमन अक्षरांत इंडिया (INDIA)असे लिहले आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजुला अटल बिहारी वाजपेयी यांची प्रतिमा आहे. तसेच त्यांचे नाव आणि जन्म, मृत्यूचे वर्ष 1924-2018 कोरण्यात आले आहे.
PM Modi at the release of a commemorative coin in memory of former PM AB Vajpayee: Today political scenario is such that if one has to stay out of power for 2-5 yrs, one gets restless. Atal Ji sat in opposition & didn't stop raising his voice for the people? pic.twitter.com/eqYG8DCNUE
— ANI (@ANI) December 24, 2018
First look of #100rupee coin released today, in the memory of #BharatRatan #AtalBihariVajpayee. pic.twitter.com/uQaXi2LkkG
— Doordarshan National (@DDNational) December 24, 2018
Prime Minister Narendra Modi releases commemorative Rs 100 coin in memory of former prime minister Atal Bihari Vajpayee. pic.twitter.com/wE1KHYgEsZ
— ANI (@ANI) December 24, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement