Video आमच्या माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो, हे दाखवून दिलं; हल्ल्यानंतर पहिल्यांदाच बोलले मोदी
Narendra Modi 7 मे रोजीची सकाळी जगभरातील लोकांनी परिणाम म्हणून पाहिली. पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर हवाई दलाने स्ट्राईक केला

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) नियोजित वेळेनुसार आज रात्री 8 वाजता देशवासीयांशी संवाद साधला. त्यामध्ये, भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती आणि ऑपरेशन सिंदूरवर (Operation sindoor) भाष्य करताना भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम केला. गेल्या काही दिवसांत भारतीय सैन्य दलाने दाखवेल्या शौर्याचा मला अभिमान आहे. मी भारतीय सैन्य दलास, त्यांच्या शौर्याला आणि प्रत्येक भारतीयांना सॅल्यूट करतो. देशातील प्रत्येक आई, मुलगी आणि लाडक्या बहिणीला मी सलाम करतो. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीयांना धर्म विचारुन ठार मारले. दहशवाद्याचा (Terrorist) हा विभत्स चेहरा आहे. दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी आपण भारतीय सैन्य दलास संपूर्ण मोकळीक दिली होती. आमच्या माता-भगिनींचं कुकूं पुसण्याचा परिणाम काय होतो, हे आम्ही दाखवून दिलं, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूरचं वर्णन केलं.
7 मे रोजीची सकाळी जगभरातील लोकांनी परिणाम म्हणून पाहिली. पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर हवाई दलाने स्ट्राईक केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की भारत एवढा मोठा हल्ला करेल. पण, राष्ट्र सर्वप्रथम आहे म्हणूनच पोलादी निर्णय आपण घेतल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. भारतीय सैन्य दलाने केवळ दहशतवाद्यांची तळ उध्वस्त केली नाहीत, तर त्यांचा इच्छाशक्तीवरही प्रहार केल्याचे मोदींनी सांगितले.
पाकिस्तानी ड्रोन अन् क्षेपणास्त्राचा चुराडा
भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान निराशेच्या गर्तेत गेला होता. त्यातूनच, पाकिस्तानने आणखी एक चूक केली ती म्हणजे दहशवाद्यांच्या पाठिशी उभे राहिला. दहशवादाविरुद्ध भारताच्या बाजुने उभे राहण्याऐवजी पाकिस्ताने भारतावर ड्रोन हल्ले सुरू केले. भारतातील शाळा, कॉलेज, मंदिर, गुरुद्वारा आणि आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या घरांनाही लक्ष्य केलं. त्यामुळे, पाकिस्तान जगासमोर उघडा पडला. पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा भारताच्या हवाई यंत्रणांपुढे चुराडा झाल्याचं जगाने पाहिलं. पाकिस्तानकडून सीमारेषेवर वार करण्याची तयारी सुरू होती. पण भारताने पाकिस्तानच्या छताडात वार केल्याचं मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं.
पाकिस्तानसोबत चर्चा POK वरच होईल
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण राष्ट्र, प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्ष दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईसाठी एका आवाजात उभा राहिला. तसेच, ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, यापुढे पाकिस्तानसोबत केवळ दहशतवाद आणि POK बाबतच चर्चा होई, असेही मोदींनी ठणकावून सांगितले.
आमच्या पद्धतीने, आमच्या अटी-शर्तीनीच उत्तर देणार
भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही तुकड्या अलर्ट आहेत. सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकनंतर आता ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांविरुद्ध भारताची नीती आहे. ऑपरेशन सिंदूरने एक नवी सीमारेषा आखलीय. जर भारतावर हल्ला झाला तर जशास तसं उत्तर दिलं जाईल. आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या अटी-शर्तींनीच उत्तर देणार, असेही मोदींनी ठणकावले.
हेही वाचा
Video भारताने पाकिस्तानच्या अणवस्त्र ठिकाणाजवळ हल्ला केला का? एअर मार्शल भारतींचे मजेशीर उत्तर
























