एक्स्प्लोर

PM Modi Pakistan: पंतप्रधान मोदींच्या पाच वाक्यांनी पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप, मॉनेटरी स्ट्राईकमुळे निर्देशांक 2500 अंकांनी कोसळला

Pakistan Stock market: भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे गुंतवणुकदारांनी हात आखडता घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानी शेअर बाजार कोसळला आहे. गुंतवणुकदारांचे पैसे बुडाले

Pahalgam Terror Attack: काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 28 भारतीय पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. यानंतर केंद्र सरकारने गंभीर पावले उचलत पाकिस्तानची चहुबाजूंनी कोंडी करायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनीही गुरुवारी बिहारमध्ये झालेल्या सभेत पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि सूत्रधारांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही कठोर शिक्षा केली जाईल, असा इशारा दिला. पंतप्रधान मोदी यांच्या या इशाऱ्यानंतर पाकिस्तानच्या भांडवली (Pakistan  Stock Exchange) बाजारात मोठी उलथापालथ झाली. (Kashmir Terror Attack)

भारताने पाकिस्तानविरोधात दिलेल्या जोरदार राजनैतिक प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानच्या भांडवली बाजारात मोठी खळबळ उडाल्याचे चित्र आहे. कराची शेअर बाजाराचा निर्देशांक कराची 100 (KSE100) तब्बल अडीच हजारांनी गडगडला आहे. यामुळे पाकिस्तानी गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पहलगाल हल्यानंतर भारताकडून पाकिस्तानवर पाच मोठे निर्बंध लादण्यात आले आहेत. भारताकडून पहिल्यांदाच  1960 साली करण्यात आलेला सिंधू नदी कराराला स्थगिती देण्यात आली आहे. या सगळ्याचे पडसाद पाकिस्तानच्या भांडवली बाजारात उमटले आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे गुंतवणुकदारांनी  हात आखडता घेतला आहे. बुधवारी देखील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानचा विकास दर म्हणजे जीडीपी वाढीचा अंदाज 2.% पर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे भांडवली बाजारात विपरीत परिणाम दिसून आला. सोबतच, पाकिस्तानी रुपयाची पडझड, राजकीय अस्थिरता आणि पाकव्याप्त काश्मीरातील असुरक्षितता या सर्वांचा परिणाम गुंतवणूकदारांवर होताना दिसत आहे.

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

पहलगाम काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत आपलं दु:ख एकसारखंच आहे, आपला आक्रोश एकसारखाच आहे. हा हल्ला पर्यटकांवर झाला नसून भारताच्या दुश्मनांनी देशाच्या आत्म्यावर हा हल्ला केलाय. ज्यांनी हा हल्ला केलाय, त्या दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा देणार, शिक्षा देणारच असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधून पाकिस्तानला दिला. तसेच, उनकी बची-खुची जमिन को भी मिठ्ठी मे मिलाने का समय आ गया है... अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिला. 

बिहारच्या भूमीतून, मी संपूर्ण जगाला सांगतो की, भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या आकांना शोधून काढेल, कठोरातील कठोर शिक्षा देईल. ते जगाच्या पाठीवर कुठेही लपले  तरी त्यांना शोधून काढू. भारताचं स्पीरिट, भारताचं धैर्य दहशतवाद्यांच्या कृत्यांमुळे खचणार नाही,दहशतवाला कदापि माफी मिळणार नाही. या प्रकरणात योग्य न्याय होईलच, यासाठी सर्व ते प्रयत्न करु.  हाच निर्धार प्रत्येक भारतीयाचा आहे. माणुसकीवर विश्वास ठेवणाऱ्या जगातील प्रत्येक देश आणि त्यांच्या नेत्यांचे आभार, असेही मोदींनी म्हटले.

आणखी वाचा

अरबी समुद्रात हालचालींना वेग, पाकिस्तानी युद्धनौकांकाडून क्षेपणास्त्र डागण्याचा सराव, भारतीय नौदलही सज्ज

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
Kagal Alliance : जुने वैरी, नवी यारी! घाटगे विरुद्ध मुश्रीफ संघर्षाचा इतिहास Special Report
Jaykumar Gore Solapur :पालिका निवडणुकांनंतर उरलेलेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, गोरेंची टोलेबाजी
Balraje Patil On Ajit Pawar : चॅलेंज देणाऱ्यांना दादा माफ करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
नाशिकच्या सिन्नर बसस्थानकात बसचा भीषण अपघात, 9 वर्षीय बालकाचा मृत्यू तर पाच जण जखमी
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
10 मिनिटे उशीर, विद्यार्थीनीला शिक्षा, आजारी पडून रुग्णालयात मुलीचा मृत्यू; शिक्षिकेविरुद्ध गुन्हा, अटक
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
अनगरनंतर बारामतीत राजकारण तापलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादी शहराध्यक्षाला मारहाण; सुप्रिया सुळेंचा संताप
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
नगराध्यक्षपदासाठी राणी निवडणुकीच्या रिंगणात; मराठी बोलता येत नसल्याने महायुतीत वाद, नितेश राणेंचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2025 | बुधवार
'त्या' सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, मालेगावातील पीडित कुटुंबीयांची भेट, चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर
'त्या' सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता, मालेगावातील पीडित कुटुंबीयांची भेट, चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
गँगस्टर लॉरेन्स बिश्वोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करताच भारतात आणलं; सलमानच्या घरासमोर फायरिंग, बाबा सिद्धीकी हत्याकांडातील मुख्य आरोपी
Embed widget