एक्स्प्लोर
Advertisement
आपण पासपोर्टचा रंग नाही, रक्ताचं नातं पाहतो : मोदी
बंगळुरु : भारतीय दूतावासाने नागरिकांना समर्पित होऊन 24 तास परदेशातील भारतीयांच्या सेवेत हजर रहावं. परदेशात आपण पासपोर्टचा रंग नाही, तर रक्ताचं नातं पाहतो. भारतीय जगाच्या कुठल्याही भागात राहत असेल, तर त्याला भारताच्या जवळ असल्याची भावना मनात आली पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 व्या प्रवासी भारतीय दिनाचं बंगळुरुमध्ये उद्घाटन केलं. या कार्यक्रमात त्यांनी भारतीय प्रवाशांच्या सुरक्षेपासून काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर मत मांडलं.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या सक्रियतेचं आणि कामाचंही मोदींनी कौतुक केलं. येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित परत आणल्याबद्दल सेनेच्या मोहिमेचंही त्यांनी कौतुकं केलं.
एफडीआय म्हणजे फर्स्ट डेव्हलप इन इंडिया : मोदी
पीओआय म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजीन कार्डला ओसीआय म्हणजे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया कार्डमध्ये बदलण्याची मुदत 31 डिसेंबर 2016 वरुन 30 जून 2017 पर्यंत वाढवली आहे, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
केंद्र सरकार लवकरच प्रवासी कौशल्य विकास योजना आणणार आहे. यामुळे परदेशात रोजगाराच्या शोधात असलेल्या भारतीयांना मदत होईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
शिवाय एफडीआयचा अर्थ केवळ थेट परदेशी गुंतवणूक असा नाही, तर फर्स्ट डेव्हलपमेंट इंडिया असा होतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement