एक्स्प्लोर

PM Modi Speech Highlights : पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे; आत्मनिर्भर भारत, भ्रष्टाचार, पंचप्राणासह 'या' मुद्द्यांवर भाष्य

PM Modi Red Fort Speech 2022 : देशाच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्याकडून जनतेला संबोधित केलं. त्यांच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या.

PM Modi Red Fort Speech 2022 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Azadi Ka Amrit Mahotsav) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्राला संबोधित केलं आहे. लाल किल्ल्यावर भाषण करण्याची पंतप्रधानांची नववी वेळ असून त्यांनी नवव्यांदा ध्वजवंदनही केलं. दरम्यान राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी अनके विषयांवर प्रकाश टाकला.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे 

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांनी स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी म्हटलं की, भारतातच नाही तर जगभरात कानाकोपऱ्यात भारतीयांनी राष्ट्रध्वज फडकवत त्याचा मान वाढवला आहे. संपूर्ण जगभरात भारताचा राष्ट्रध्वज अभिमानानं फडकतोय. जगभरात पसरलेल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

2. देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, 'आज भारताचा तिरंगा जगाच्या कानाकोपऱ्यात अभिमानानं फडकतोय. भारतातच नाही तर जगभरात कानाकोपऱ्यात भारतीयांनी राष्ट्रध्वज फडकवत त्याचा मान वाढवला आहे. संपूर्ण जगभरात भारताचा राष्ट्रध्वज अभिमानानं फडकतोय. जगभरात पसरलेल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.'

3. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं की, 'संपूर्ण गुलामगिरीचा काळ स्वातंत्र्याच्या लढ्यात घालवला. भारताचा असा एकही कोपरा नाही जिथे लोकांनी शेकडो वर्ष गुलामगिरीविरुद्ध लढा दिला नाही. त्याग केला नाही. 

4. पंतप्रधानांनी महापुरुषांना तसेच वीरांगनांना नमन आणि अभिवादन केलं. त्यांनी म्हटलं की, 'आज आपण सर्व देशवासियांना प्रत्येक महापुरुषांना, त्यांच्या त्यागाला अभिवादन करण्याची संधी आहे. त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची प्रतिज्ञा घेण्याची ही संधी आहे.' यावेळी त्यांनी म्हटलं की, 'मंगल पांडे, तात्या टोपे, भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, अशफाकुल्ला खान, राम प्रसाद बिस्मिल आणि ब्रिटीश राजवटीचा पाया हादरवणाऱ्या आपल्या असंख्य क्रांतिकारकांचा देश कृतज्ञ आहे.' 

5. देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'या स्वातंत्र्यदिनी मी सर्व भारतीयांना आणि भारतावर प्रेम करणाऱ्यांना शुभेच्छा देतो. नव्या निर्धारानं नव्या दिशेनं वाटचाल करण्याचा दिवस आहे. 

6. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पहिल्यांदाच देशभरात एवढा मोठा उत्सव साजरा केला जात आहे. मार्च 2022 पासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला सुरुवात झाली. यामध्ये देशभरात अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत.

7. येत्या काळात आपण 'पंचप्राण'वर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. यामध्ये पहिले - विकसित भारताचे मोठे संकल्प आणि संकल्प घेऊन पुढे जा; दुसरे - गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाका; तिसरे - आपल्या वारशाचा अभिमान बाळगा; चौथे - एकतेचे सामर्थ्य आणि पाचवे - नागरिकांची कर्तव्ये ज्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे.

8. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात आत्मनिर्भर भारत मोहिमेचा पुर्नरुच्चार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 'आत्मनिर्भर भारत, ही प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक सरकारची, समाजाच्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. आत्मनिर्भर भारत, हा सरकारचा अजेंडा किंवा सरकारी कार्यक्रम नाही. हे समाजाचं जनआंदोलन आहे, जे आपल्याला पुढे न्यायचं आहे.'

9. डिजिटल इंडिया योजनेवरही पंतप्रधानांनी भाष्य केलं आहे. 'आपण 'डिजिटल इंडिया' उपक्रम पाहत आहोत, देशात स्टार्टअप वाढवत आहेत आणि टियर 2 आणि 3 शहरांमधून भरपूर प्रतिभा समोर येत आहेत. आपल्याला आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

10. पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निशाणा साधत म्हटलं आहे की, कोणाकडे राहायला जागा नाही आणि तर कुणाकडे चोरीचा माल ठेवायला जागा नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. गेल्या आठ वर्षांत, आम्ही थेट लाभ हस्तांतरण करून दोन लाख कोटी रुपयांची बचत केली आहे. हा पैसा चुकीच्या हातात जायचा. पूर्वीच्या सरकारांमध्ये बँका लुटून पळून गेलेल्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जात आहेत. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही एका गंभीर पाऊलं उचलत आहोत, असं पंतप्रधानांनी सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पूर्ण भाषण येथे ऐका.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada FIR: नागपूरमध्ये हिंसाचार, काय सांगते एफआयआर? त्या रात्री नेमकं काय घडलं?Sangh On Nagpur Rada : कान टोचले, नागपूरच्या राड्यानं संघानं काय मांडली भूमिका?Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
Embed widget