(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi : PM मोदी 'मिशन साऊथ' साठी रवाना! चार राज्यांना देणार भेट, 25 हजार कोटींच्या प्रकल्पाचे करणार उद्घाटन
PM Modi Southern States Visit : पंतप्रधान मोदी 25 हजार कोटींहून अधिक किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.
PM Modi Southern States Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 11 नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून कर्नाटक (Karnataka), तामिळनाडू (Tamilnadu), आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत. तसेच ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असून विकास योजनांची सुरुवात करणार आहेत. पंतप्रधान मोदी आज बेंगळुरू, कर्नाटक येथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. दक्षिण भारतातील पहिली आणि भारतातील पाचवी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. यासोबतच ते तामिळनाडूतील मदुराई येथे होणाऱ्या दीक्षांत समारंभालाही उपस्थित राहणार आहेत.
अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन
प्रथम ते बंगळुरूमधील संत-कवी कनक दास आणि महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. यानंतर पंतप्रधान वंदे भारत एक्सप्रेस आणि भारत गौरव काशी दर्शन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. नंतर केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 चे उद्घाटन करतील. बेंगळुरू येथे सार्वजनिक कार्यक्रमानंतर ते नादप्रभू केंपेगौडा यांच्या 108 फूट ब्राँझ पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. पंतप्रधान मोदी आज दुपारी तामिळनाडूतील दिंडीगुल येथे गांधीग्राम ग्रामीण संस्थेच्या 36 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
विशाखापट्टणम येथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
अधिकृत माहितीनुसार, पंतप्रधान मोदी शनिवारी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. ते तेलंगणातील रामागुंडम येथील आरएफसीएल प्लांटलाही भेट देतील आणि तेथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करतील. दुसऱ्या दिवशी शनिवारी 12 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान सकाळी 10 वाजता आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे साडे दहा हजार कोटींच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यानंतर, दुपारी पीएम मोदी तेलंगणातील रामागुंडम येथील आरएफसीएल प्लांटला भेट देतील, तसेच अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. याशिवाय पीएम मोदी इतरही अनेक प्रकल्प सुरू करणार आहेत.
दीक्षांत समारंभात अनेक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करणार
पंतप्रधान तामिळनाडूच्या गांधीग्राममध्ये गांधीग्राम ग्रामीण संस्थेच्या 36 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करतील. दीक्षांत समारंभात दोन हजार तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. तसेच विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश 2900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून उभारण्यात आलेल्या ONGC च्या U फील्ड ऑनशोर डीप वॉटर ब्लॉक प्रकल्पाचे उद्घाटन करतील, ते गेलच्या श्रीकाकुलम अंगुल नॅचरल गॅस पाइपलाइन प्रकल्पाची पायाभरणीही करतील. पंतप्रधान मोदी रामागुंडम येथील खताचा प्लांट देशाला समर्पित करणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या