एक्स्प्लोर

काही जण दहशतवादाचा व्हायरस पसरवत आहेत; मोदींचा पाकिस्तानवर निशाणा

नॉन अलायन मुव्हमेंटच्या (NAM) वर्च्युअल समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी जगभरातील अनेक देशांसोबत संवाद साधला. तसेच नाव न घेता पाकिस्तानवरही त्यांनी निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : कोरोनासारख्या महाभयंकर व्हायरसच्या विळख्यात संपूर्ण जग अडकलं आहे. अशातच कोरोनाच्या महामारीविरोधात लढण्याच्या पद्धतीसंदर्भात नॉन अलायन मुव्हमेंटच्या (NAM) वर्च्युअल समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी जगभरातील अनेक देशांसोबत संवाद साधताना पाकिस्तानवरही टिकास्त्र डागलं आहे. पाकिस्तानवर निशाणा साधत मोदी म्हणाले की, 'देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे, मात्र काही लोक असेही आहेत, जे दहशतवादाचा व्हायरस पसरवत आहेत.' दरम्यान, यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेदेखील पंतप्रधान मोदींसोबत या बैठकीत सहभागी झाले होते.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या नॉन अलायन मुव्हमेंटच्या (NAM) वर्च्युअल समिटमध्ये मोदी म्हणाले की, 'जग भलेही कोरोना व्हायरचा सामना करत आहे. मात्र, काही लोक दहशतवाद, फेक न्यूज, अफवा आणि समाजाला फोडण्यासाठी व्हिडीओसारखे काही घातक व्हायरस पसरवत आहेत. भारतीय सभ्यता ही संपूर्ण जगाला एक कुटुंब मानते. आम्ही आमच्या देशांतील नागरिकांची काळजी घेत असतानाच, इतर देशांनाही मदत करत आहोत.'

पाहा व्हिडीओ : परप्रांतियांच्या माथी तिकिटाचा भार का? रेल्वे तिकिटावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

समिटमध्ये बोलताना मोदींनी कोणाचंही नाव न घेता केलेल्या टिकेचा ओघ पाकिस्तानकडेच होता. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यासोबत झालेल्या चकमकीत 5 भारतीय सैनिक शहीद झाले. एवढचं नाहीतर काश्मिर खोऱ्यात भारताबाबत पाकिस्तानकडून अनेक खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्यात येत असून सोशल मीडियाच्या आधारावर इन्फॉर्मेशन वॉरही सुरू आहे.

नॉन अलायन मुव्हमेंटच्या (NAM) वर्च्युअल समिटमध्ये बोलताना मोदी म्हणाले की, 'एक जन आंदोलन उभे करण्यासाठी लोकशाही, शिस्त आणि निर्णायकता यांचा कशाप्रकारे संगम होऊ शकतो, हे आपण या संकटाच्या काळात पाहीले आहे.' महत्त्वाचं म्हणजे, 2014ला पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्यांदाच या बैठकीत भाग घेतला आहे. लोकांनी घरगुती आयुर्वेदिक गोष्टींचा उपयोग केला तर त्यांची रोग प्रतिकारक शक्ती वाढू शकते, असंही मोदी या समिटमध्ये बोलताना म्हणाले.

रोनाचा सामना करण्यासाठी आम्ही आमच्या जवळच्या देशांशी समन्वय साधण्यास महत्व दिले. अम्ही अनेक देशांशी भारतीय वैद्यकीय कौशल्यावर ऑनलाइन ट्रेनिंगदेखील सुरू केली आहे. आम्हाला गरज असतानाही आम्ही 123 हून अधिक भागीदारी असलेल्या देशांना वैद्यकीय पुरवठा निश्चित केला आहे, असेही मोदी म्हणाले.

मोदी समिटमध्ये पुढे बोलताना म्हणाले की, 'कोरोनाच्या संकटात भारताने फक्त स्वतःचीच नाही तर इतरांचीही काळजी घेतली आहे. महत्त्वाचं म्हणजे, भारताने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आपल्या गरजांसोबतच जगभरातील 123हून अधिक देशांना औषधं पुरवली. यामधील एकूण 53 देश नॉन अलायन मुव्हमेंट (NAM)मधील आहेत.

संबंधित बातम्या : 

दिलासादायक! देशभरात 27.52 टक्के रुग्ण कोरोनामुक्त; गेल्या 24 तासात 1074 रुग्ण बरे झाले : आरोग्य मंत्रालय

विदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी विमानं, नौदलाची जहाजं सज्ज, 7 मे पासून टप्याटप्यानं सुरुवात

महत्त्वाच्या बातम्या

व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget