PM Modi : पंतप्रधानांचा राष्ट्रकुल स्पर्धेत पदक विजेत्यांशी संवाद, खेळाडूंचं केलं अभिनंदन; भारताची 61 पदकांची कमाई
CWG 2022 Medalist : बर्मिंघम येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 2022 (Commonwealth Games 2022) पदक मिळवलेल्या भारतीय खेळाडूंची पंतप्रधान मोदी यांनी भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं आहे.
PM Modi Meet CWG 2022 Medalist : राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. भारतीय खेळाडूंनी कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये एकूण 61 पदकांची कमाई केली. यानिमित्तानं खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत संवाद साधला. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकं जिंकली आहेत.
104 पुरुष आणि 103 महिला खेळाडूंचा सहभाग
यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेण्याची भारताची 18 वेळ आहे. यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत भारतातील एकूण 104 पुरुष आणि 103 महिलांनी सहभाग घेतला होता. भारतासाठी पुरुषांनी 35 तर महिलांनी 26 पदकं जिंकली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कुस्ती आणि वेटलिफ्टिंगमध्ये सर्वाधिक पदकं जिंकली आहेत.
कुस्ती आणि वेटलिफ्टिंगमध्ये सर्वाधिक पदकं
कुस्तीमध्ये भारताने एकूण 12 पदकं जिंकली आहेत. या खेळात भारतीय कुस्तीपटूंनी 6 सुवर्ण, एक रौप्य आणि 5 कांस्य पदकं जिंकली आहेत. तसेच वेटलिफ्टिंगमध्ये भारताने 10 पदकं जिंकली आहेत. याशिवाय भारतीय बॉक्सर्सनेही सात पदकांवर नाव कोरलं आहे.
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतासाठी पदक जिकणाऱ्या खेळाडूंची यादी
सुवर्णपदक - 22 : मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना (पीपी), नीतू घणघस, अमित पंघल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरत कमल-श्रीजा अकुला, पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, सात्विक-चिराग, शरथ कमल.
रौप्यपदक - 16 : संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियांका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर, शरत-साथियान, भारतीय महिला क्रिकेट टीम, सागर, पुरुष हॉकी संघ
कांस्यपदक - 23 : गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला संघ, संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव, घोषाल-दीपिका, श्रीकांन किदाम्बी, त्रिशा- गायत्री, साथियान.