PM Modi Maharashtra LIVE : शरद पवार कृषीमंत्री होते, केंद्रात यूपीएचं भ्रष्ट सरकार होतं, मोदींचा हल्लाबोल
PM Modi in Yavatmal Maharashtra Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्रातील यवतमाळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचं लोकार्पण केलं.
LIVE
Background
PM Modi in Maharashtra Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्रातील यवतमाळ दौऱ्यावर होते. यवतमाळ जिल्ह्यातील डोरली येथे झालेल्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं.
PM Modi speech : शरद पवार कृषीमंत्री होते, तेव्हा केंद्रात यूपीएचं भ्रष्ट सरकार होतं, मोदींचा हल्लाबोल
विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या रेल्वे कनेक्टिव्हिटी निर्माण झाली आहे. जेव्हा यूपीए सरकार होते, तेव्हा काय अवस्था होती?. तेव्हा तर महाराष्ट्रातले कृषी मंत्री (शरद पवार) होते. तेव्हा दिल्लीतून शेतकरी पॅकेज जाहीर व्हायचे मात्र शेतकऱ्यांच्या हाती पैसे जात नव्हते. आज मी एक बटण दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 21 हजार कोटी एवढी मोठी रक्कम पोहोचली आहे. हीच तर मोदींची गॅरंटी आहे. हेच काँग्रेस शासन असते, तर 21 हजार कोटी पैकी 18 हजार कोटी खाऊन टाकले असते.
PM Modi speech : मागच्यावेळी यवतमाळमध्ये आलो NDA 350 पार गेली, आता 400 पार नक्की होणार
यवतमाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यवतमाळमध्ये विविध विकासकामांचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना मोदींनी "जय भवानी, जय शिवाजी, जय सेवालाल, जय बिरसा" असे अभिवादन करून भाषणाला मराठीत सुरुवात केली.
पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?
10 वर्षांपूर्वी चाय पर चर्चा करायला आलो तेव्हा तुम्ही NDA ला 300 पार केले.. 2019 मध्ये आलो तेव्हा तुम्ही खूप प्रेम दिले, तेव्हा तुम्ही NDA ला 350 पार पोहोचवले. आणि आता 2024 मध्ये जेव्हा विकास पर्वाला आलो आहे.. तेव्हा देशात एकच आवाज आहे, अब की बार 400 पार.
संपूर्ण विदर्भात ज्या पद्धतीचं प्रेम मिळत आहे, ते पाहता हे निश्चित आहे यंदा NDA 400 पार.
आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे लोकं आहोत. शिवाजी महाराजांनी नेहमी देशाची चेतना जागी करण्यासाठी काम केले. आम्हीही त्यासाठी काम करत आहोत. देशाच्या प्रत्येक कोपऱ्याला विकसित बनवण्याचं माझा स्वप्न आहे. त्यासाठी चार प्राधान्य घटक आहे. गरीब , युवा, शेतकरी, महिला हे सशक्त झाले तर देश विकसित होईल. आज या चारही घटकांसाठी काम झाले आहे.
CM Ekanth Shinde speech Yavatmal: देशात 400 तर महाराष्ट्रात 45 पार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार
10 वर्षात मोदींनी एक ही सुट्टी घेतली नाही. आता घर घर मोदी नाही ते मन मन मोदी आहे. मोदींवर त्यांच्या गॅरंटी वर जनतेचा विश्वास आहे. मोदी तिसऱ्यांदा pm बनणार. यंदा देशात 400 पार निश्चित असून महाराष्ट्रात आम्ही 45 पार करून मोदींचे हाथ मजबूत करणार..
CM Ekanth Shinde speech Yavatmal: पंतप्रधान मोदी हॅटट्रिक करणार
महाराष्ट्रात आम्ही मोदींचा हार्दिक स्वागत करतो.. मागील दशक आमच्या देशासाठी स्वर्णकाळ राहिला असून त्याचे शिल्पकार मोदी आहेत...
महाराष्ट्रात मोदींच्या हस्ते महाराष्ट्रात अनेक योजना मिळत असून त्यावरून महाराष्ट्रावर मोदींचा प्रेम दिसून येते..
महाराष्ट्राच्या नमो महिला सक्षमीकरण अभियान द्वारे 55 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळेल.. तर 2 कोटी महिला बचत गटांशी जोडल्या जातील...
मोदींनी गेल्या 10 वर्षात आत्मनिर्भर भारताची योजना राबवून देशाचा आत्मविश्वास वाढविला आहे..
Devendra Fadnavis speech Yavatmal: गरीब, शेतकरी, युवा आणि महिला या चारच जाती : देवेंद्र फडणवीस
ज्या यवतमाळ मध्ये जगातील एकमेव सीता मातेचं मंदिर आहे तिथं आज मोदींच्या हस्ते नारी वंदन कार्यक्रम होत आहे. साडे पाच लाख बचत गटांना revolving fund म्हणून कोट्यवधींचा निधी दिला जात आहे. मोदी नेहमी म्हणतात फक्त चार जाती आहेत, गरीब, शेतकरी, युवा आणि महिला.. आज या चारही जातींना मदत मिळत आहे.
शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आज 4 हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. शिवाय मोदी आवास योजनेअन्वये घरे दिली जाणार आहे, त्यात ही महिलांना घराचा संयुक्त मालकी हक्क मिळेल. सिंचनाच्या योजनाही देऊन विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर केले जात आहे. वर्धा ते कळंब पर्यंत रेल्वे ही मिळत आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.