एक्स्प्लोर

Sanjay Raut: देशाचा पंतप्रधानच सगळ्यात मोठा बुवा,सरकारकडून भोंदुगिरी अन् अंधश्रद्धांना खतपाणी; संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका

hathras stampede:महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेसाठी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खारघरला भर उन्हाता श्रीसेवकांना बसवले होते, असे संजय राऊत यांनी म्हटले.

मुंबई: महाराष्ट्रातील खारघर येथे महाराष्ट्र भूषण येथे सोहळ्यात घडलेली असलेली चेंगराचेंगरी असो किंवा हाथरसमध्ये घडलेली घटना असो, हे सर्वजण अंधश्रद्धेचे बळी आहेत. या अंधश्रद्धेला देशातील राज्यकर्तेच खतपाणी घालत आहेत. देशातील राजकारणीच बुवा आणि महाराजांना प्रतिष्ठा देतात. त्यामुळे असल्या दुर्घटना घडतात. देशाचा पंतप्रधानच सर्वात मोठा बुवा आहे. इथूनच भोंदुगिरी सुरु होते, अशा शब्दांत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर घणाघाती टीका केली. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांसारखं वागलं पाहिजे. पण तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करता, स्वत:ला बाबा म्हणवता. स्वत:ला देवाचा अवतार म्हणवून घेता. तुम्ही हिंदू-मुसलमान करता. ही भोंदुगिरी, बुवाबाजी आहे. देशाचा पंतप्रधानच जर अशाप्रकारे भोंदुगिरी करणार असेल तर तुम्ही काय करणार, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्र भूषण दुर्घटनेचा उल्लेख करत राऊतांनी राज्य सरकारला धारेवर धरले

यावेळी संजय राऊत यांनी हाथरसमधील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरुन उत्तर प्रदेश सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. याप्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केले. पण ज्याच्यामुळे गुन्हा घडला त्याच्यावरच कारवाई झालेली नाही. कारण त्याला राजकीय संरक्षण आहे. 80 हजार लोकांची परवानगी असताना हाथरसमध्ये अडीच लाख लोक कसे जमले?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

यावेळी संजय राऊत यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी राज्य सरकारने आयोजित केलेल्या कार्य़क्रमाचा उल्लेख केला. या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन अनेक श्रीसेवकांचा जीव गेला होता. याच मुद्द्यावरुन संजय राऊतांनी राज्य सरकारला धारेवर धरले. याप्रकरणात राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता. कारण, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भर उन्हात हा कार्यक्रम खारघरला घेतला होता. हजारो साधक याठिकाणी जमले होते. भर उन्हात त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती, छप्पर नव्हते. देशाचे गृहमंत्रीही त्याठिकाणी उपस्थित होते. त्याठिकाणी पळापळ होऊन अनेकांची जीव गेले. यासाठी राज्य सरकावरच कारवाई झाली पाहिजे होती.  पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जातात. तेथील कामाख्या मंदिरात रेडे कापतात. पण यांच्यावर कायद्याने कारवाई करणार कोण, असा सवाल राऊत यांनी विचारला. 

आणखी वाचा

'240 चे 275 खासदार कधी होतील, हे मोदी-शाहांना कळणारही नाही'; संजय राऊत नाशिकमधून गरजले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Hasya Kavi Sanmelan on Holi Festival | एबीपी माझा हास्य कवी संमेलन 2025 ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 14 March 2025Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaNana Patole On Shinde And Ajit Pawar| होळीच्या शुभेच्छांसह पटोलेंकडून शिंदे, अजितदादांना  मुख्यमंत्रिपदाची ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
Embed widget