एक्स्प्लोर

PM Modi Highest Honor: फिजी आणि पापुआ न्यू गिनी नाही तर आतापर्यंत नऊ देशांनी पंतप्रधान मोदींना केले सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित, जाणून घ्या संपूर्ण यादी

PM Modi Highest Honor: 2016 मध्ये सौदी अरेबियाने पंतप्रधान मोदींना 'अब्दुलाझीझ अल सौद' हा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर देखील पुरस्काराची मालिका सुरूच राहिली.

PM Modi News:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजी आणि पापुआ न्यू गिनी देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतर देशांकडून सन्मानित करण्यात आलेली ही पहिली वेळ नाही तर आतापर्यंत नऊ देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान केली आहे.  2016 मध्ये सौदी अरेबियाने पंतप्रधान मोदींना 'अब्दुलाझीझ अल सौद' हा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर देखील पुरस्काराची मालिका सुरूच राहिली.

2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'अमीर अमानुल्लाह खान पुरस्कार' या अफगाणिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सनमानित करण्यात आले आहे. अमीर अमानुल्लाह खान पुरस्कार हा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. या पुरस्काराचे नाव अफगाणिस्तानचे राष्ट्रीय प्रमुख अमानुल्लाह खान (गाजी) यांच्या नावावर ठेवण्यात आला आहे. अफगाणिस्तानचे ते स्वातंत्र्यवीर होते.

फिलिस्तीनमध्ये देखील सन्मानित

 पंतप्रधान नरेंद्र मोदी 2018 साली फिलिस्तीनच्या दौऱ्यावर गेले होते त्यावेळी त्यांना 'ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ फिलिस्तीन' पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.  त्यानंतर 2019 साली संयुक्त अरब अमीरातला  (United Arab Emirates) भेट दिली होती. त्यावेळी त्यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान  'ऑर्डर ऑफ जायद' (Order of Zayed)ने सन्मानित करण्यात आले.

2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाच्या सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्रयू' सन्मानित करण्यात आले. त्यानंतर शेजारी असणाऱ्या मालदीवने देखील त्यांना  'निशान इज्जुद्दीन' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. बहरीनने 2019 साली  हमाद 'ऑर्डर ऑफ दि रेनेसां', 2020 साली अमेरिकेच्याने 'लीजन ऑफ मेरिट’पुरस्काराने सन्मानित केले. तर भूतानने 2021 साली मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ऑर्डर ऑफ दी ड्रक गियल्पो' पुरस्काराने सन्मानित केले.

पापुआ न्यू गिनी-पंतप्रधान मारापेंनी घेतले मोदींचे आशीर्वाद 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे रविवारी पापुआ न्यू गिनीच्या दौऱ्यावर गेले. त्यावेळी तिथे पोहचले असता पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारपे (James Marpe) यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना वाकून नमस्कार केला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 19 मेपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांना भेट दिली. पंतप्रधान मोदी यांनी जपानमध्ये होणाऱ्या G-7 शिखर परिषदेला हजेरी लावली. 22 ते 24 मे रोजी सिडनीमध्ये मोदींची ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीस यांच्याशी द्विपक्षीय बैठक असेल. मोदी ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांसह सिडनीमध्ये हजारो भारतीयांना संबोधित करतील. त्यांचा हा दौरा सांस्कृतिक, व्यवसाय आणि परदेशी भारतीयांशी संबंधित समस्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

हे ही वाचा :

Sanjay Raut on PM Narendra Modi : मोदींचे चरणस्पर्श करणारे पंतप्रधान भ्रष्टाचारी आहेत; संजय राऊतांची मोंदींना कोपरखळी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget