PM Modi Gifts Auction: PM मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा चौथ्यांदा होणार लिलाव, कुठे आणि कधी होणार लिलाव? जाणून घ्या
PM Modi Gifts Auction: पीएम मोदींना मिळालेल्या या भेटवस्तूंचा दरवर्षी लिलाव होतो. यंदाही पंतप्रधान मोदींना मिळालेल्या 1200 हून अधिक वस्तूंचा लिलाव होत आहे,
PM Modi Gifts Auction: पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) दरवर्षी वेगवेगळ्या प्रसंगी अनेक भेटवस्तू मिळतात. यात विविध देशांचे खेळाडू, राजकारणी आणि सामान्य माणसांकडून दिलेल्या भेटवस्तूंचाही समावेश आहे. पीएम मोदींना मिळालेल्या या भेटवस्तूंचा दरवर्षी लिलाव होतो (PM Modi Gift Auction) यंदाही पंतप्रधान मोदींना मिळालेल्या 1200 हून अधिक वस्तूंचा लिलाव होत आहे, ज्याची सुरूवात 17 सप्टेंबरपासून होणार आहे. या लिलावातून मिळणारा सर्व पैसा नमामि गंगे मिशनमध्ये वापरला जाईल. पीएम मोदींना मिळालेल्या भेटवस्तू खरेदी करण्याची ही संधी तुम्हाला 2 ऑक्टोबरपर्यंत मिळेल. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावाची ही चौथी आवृत्ती असेल.
लिलाव कुठे होईल?
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे महासंचालक अद्वैत गडानायक यांनी सांगितले की, हा लिलाव 17 सप्टेंबरपासून म्हणजेच पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीपर्यंत चालेल. pmmementos.Gov.In या वेबपोर्टलद्वारे आयोजित केला जाईल.
100 रुपयांपासून बोली सुरू होणार
पंतप्रधान मोदींना विविध वर्ग गटांकडून भेटवस्तू मिळतात, ज्यात भारताची संस्कृती आणि वारशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध भेटवस्तू असतात. लिलावासाठी ठेवलेल्या या भेटवस्तूंची मूळ किंमत 100 रुपयांपासून सुरू होते आणि ती 10 लाख रुपयांपर्यंत जाते.
या खास गोष्टींचा लिलाव होणार
पीएम मोदींना मिळालेल्या कोणत्या भेटवस्तूंचा लिलाव होत असून या यादीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भेट दिलेली राणी कमलापतीची मूर्ती, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली हनुमानाची मूर्ती आणि सूर्यचित्र योगी आदित्यनाथ आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी भेट दिलेला त्रिशूळ यांचा समावेश आहे. भेटवस्तूंच्या यादीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भेट दिलेली कोल्हापुरातील देवी महालक्ष्मीची मूर्ती आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी भेट दिलेली भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती यांचाही समावेश आहे.
पंतप्रधानांना या वस्तू भेट मिळाल्या
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे संचालक टेमसुनारो जमीर म्हणाले की, पंतप्रधानांकडे पदक विजेत्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेले टी-शर्ट, बॉक्सिंग ग्लोव्हज, भाला आणि रॅकेट यासारख्या क्रीडा वस्तूंचा विशेष संग्रह आहे. या भेटवस्तूंमध्ये उत्कृष्ठ चित्रे, शिल्पे, हस्तकला आणि लोक कलाकृतींचाही समावेश आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधानांना पारंपारिक अंगवस्त्र, शाल, हेडगियर, तलवारी इत्यादी अनेक वस्तू भेट म्हणून मिळाल्या आहेत. याशिवाय इतर काही संस्मरणीय वस्तूंमध्ये अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या श्री राम मंदिर आणि वाराणसीतील काशी-विश्वनाथ मंदिराच्या प्रतिकृती आणि मॉडेल्सचाही समावेश आहे.