(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi : देहू मंदिर बंद ठेवण्याच्या निर्णयात थोडा बदल, पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी मंदिर तीन ऐवजी एकच दिवस राहणार बंद
PM Modi Dehu Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या देहूतील संत तुकाराम महाराजांचे मंदिर आता तीन दिवस नव्हे तर एकच दिवस दर्शनासाठी बंद राहणार आहे.
PM Modi Visit To Dehu : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या देहूतील (Dehu) संत तुकाराम महाराजांचे मंदिर (Saint Tukaram Maharaj) आता तीन दिवस नव्हे तर एकच दिवस दर्शनासाठी बंद राहणार आहे. समाज माध्यमांवर उमटलेल्या प्रतिक्रियांमुळे आधीच्या निर्णयात हा बदल करण्यात आला आहे. पण आज आणि उद्या मंदिर परिसरात पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही काम सुरु असेल, त्या वेळेत दर्शन बंद असेल. हा कालावधी दिवसातून प्रत्येकी दोन तासांनी घेण्यात येईल, असं देहू संस्थानने स्पष्ट केलंय. देहू संस्थानाचे अध्यक्ष नितीन मोरे महाराज यांनी यासंदर्भात माहीती दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रोटोकॉल पाहता, केंद्रीय तपास यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांना कार्यक्रमस्थळाचा ताबा घ्यावा लागतो. त्यामुळं ते या ठिकाणी पोहचल्यावर भाविकांना दर्शनापासून वंचित राहावं लागू शकतं.
मंदिर तीन दिवस बंद ठेवण्याच्या आधीच्या निर्णयात बदल
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर देहूतील जगतगुरू संत तुकाराम महाराजांचं मंदिर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आधी संस्थानानं घेतला होता. त्यानुसार, 12 जूनपासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी देहूमध्ये येणार आहेत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता संस्थानानं हा निर्णय बदलून केवळ एकच दिवस मंदिर बंद ठेवणार असल्याचं सांगितलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिळा मंदिर, तुकोबांच्या मूर्तीच लोकार्पण होणार आहे. त्यामुळं सुरक्षेच्या दृष्टीने रविवारी 12 जून सकाळी 8 ते 14 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला होता. देहू मंदिरात रोज वीस ते पंचवीस हजार भाविक दर्शनासाठी येतात तर सुट्टीच्या दिवशी हा आकडा वाढतो. पंतप्रधानांच्या पार्श्वभूमीवर इतर भक्तांना दर्शनापासून वंचित राहावं लागेल, अशी टीका अनेक स्तरांतून झाली. यानंतर आता मंदिर प्रशासनानं या निर्णयात हदल करत तीनऐवजी एकच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा व्हिडीओ : संत तुकाराम शिळा मंदिराचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते 14 जूनला लोकार्पण
महत्त्वाच्या इतर बातम्या