एक्स्प्लोर

PM Modi Australia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी जीवे मारण्याची धमकी; मेलबर्न पोलिसांकडून हाय-अलर्ट

PM Modi Threat Row : पंतप्रधान मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी फेसबुक पोस्टवर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पोलिसांनी (AFP) या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

PM Modi Australia Visit Threat : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुढील आठवड्यात 6 ते 11 जुलै दरम्यान तीन देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर रवाना होणार आहेत. या दौऱ्यात ते इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट देणार असून, 8 ते 10 जुलै दरम्यान त्यांचा ऑस्ट्रेलिया दौरा नियोजित आहे. मात्र, या दौऱ्यापूर्वी एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी (PM Modi Australia Tour) त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी (PM Modi Death Threat) देण्यात आली आहे. या गंभीर घटनेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणा हाय-अलर्टवर (High Alert) आल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न (Melbourne) शहरात आयोजित होणाऱ्या पंतप्रधानांच्या एका भव्य कम्युनिटी प्रोग्रामच्या जाहिरातीसाठी करण्यात आलेल्या सोशल मीडिया पोस्टवर ही धमकी देण्यात आली आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाची फेडरल पोलीस (AFP) यंत्रणा तातडीने ॲक्शन मोडमध्ये आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.

Melbourne Meets Modi : 'मेलबर्न मीट्स मोदी' कार्यक्रमाच्या फेसबुक पोस्टवर धमकी

'द ऑस्ट्रेलिया टुडे'च्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान 9 जुलै रोजी मेलबर्न येथील प्रसिद्ध 'मार्वल स्टेडियम'मध्ये (Marvel Stadium) 'मेलबर्न मीट्स मोदी' (Melbourne Meets Modi) या नावाच्या एका भव्य कम्युनिटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी आणि भारतीय समुदायाला आमंत्रित करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही पोस्ट शेअर करण्यात आल्या होत्या.

या अंतर्गत फेसबुकवर करण्यात आलेल्या एका अधिकृत पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये एका माथेफिरूने थेट पंतप्रधानांना लक्ष्य करत धमकीवजा कमेंट केली. या कमेंटमुळे दोन्ही देशांच्या गुप्तहेर आणि सुरक्षा यंत्रणांचे कान टोकारले गेले आहेत.

Abu Mustafa Facebook Threat Comment : 'अबू मुस्तफा' नावाच्या अकाऊंटवरून धमकी

रिपोर्टनुसार, ही आक्षेपार्ह टिप्पणी 'अबू मुस्तफा' (Abu Mustafa) नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून करण्यात आली आहे. या कमेंटमध्ये लिहिले होते की, "कार्यक्रमाच्या दरम्यान स्टेडियमचे छत (Rooftop) पूर्णपणे बंद ठेवलेले बरे, अन्यथा तो ऑस्ट्रेलियात स्वतःच्या मृत्यूसाठीच येईल." स्टेडियमच्या छताचा आणि संरक्षणाचा उल्लेख करत थेट जीवे मारण्याची भाषा वापरल्यामुळे ऑस्ट्रेलियन पोलिसांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. ज्या दिवशी ही कमेंट ऑनलाइन आली, त्याच दिवशी हे प्रकरण ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पोलिसांकडे (AFP) सोपवण्यात आले.

AFP Traced IP Address : ऑस्ट्रेलियन पोलिसांना मोठे यश; आरोपीचा 'आयपी ॲड्रेस' शोधला

या संवेदनशील प्रकरणाचा तपास करणाऱ्या ऑस्ट्रेलियन तपास अधिकाऱ्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फेसबुक पोस्टवर कमेंट करणाऱ्या संबंधित अकाऊंटचा 'आयपी ॲड्रेस' (IP Address) शोधून काढला आहे. हा कमेंट करणारा व्यक्ती नेमका कोण आहे, तो कुठे राहतो आणि या धमकीमागे त्याचा मुख्य हेतू किंवा काही आंतरराष्ट्रीय कट कारस्थान (Larger Conspiracy) आहे का, याची कसून चौकशी सुरू आहे. तसेच या कृत्याद्वारे देशाच्या फौजदारी कायद्यांचे (Criminal Offences) उल्लंघन झाले असल्याने आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाईची तयारी सुरू आहे.

Security Tightened For PM Modi : ऑस्ट्रेलियात कडक नियमावली

ऑस्ट्रेलियातील मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखांच्या किंवा जागतिक नेत्याच्या दौऱ्यादरम्यान उद्भवणाऱ्या अशा सुरक्षा धोक्यांकडे ऑस्ट्रेलियन लॉ एन्फोर्समेंट एजन्सी अत्यंत संवेदनशीलतेने पाहतात. पंतप्रधान मोदींच्या या हाय-प्रोफाइल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता ऑस्ट्रेलियाची फेडरल पोलीस (AFP), प्रांताचे राज्य पोलीस आणि विशेष सुरक्षा रक्षक युनिट्स (Specialist Protective Security Units) एकत्र आले असून, मार्वल स्टेडियमसह संपूर्ण मेलबर्न शहरात सुरक्षा व्यवस्था अभेद्य करण्यात आली आहे. या धमकीनंतरही पंतप्रधान मोदींचा दौरा पूर्वनियोजित वेळेनुसारच पार पडेल, असे सांगण्यात येत आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget