एक्स्प्लोर

PM Modi on LPG: अमेरिका-इराण युद्धावेळी घरगुती गॅस सिलेंडरचे दर 2000 रुपयांवर पोहोचले असते, संकटातून कसा मार्ग काढला, नरेंद्र मोदींनी सविस्तर सांगितलं... 

LPG News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानात एका सभेला संबोधित करताना अमेरिका -इराण युद्धानंतर घरगुती सिलेंडरचे दर 2 हजार रुपयांपर्यंत पोहोचले असते, असं म्हटलं.

LPG Cylinder Price News जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील बालोतरामध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांसदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की इंधन संकटाच्या काळात घरगुती सिलेंडरचे दर दोन हजार रुपयांपर्यंत जाऊ शकले असते. मात्र, सरकारनं प्रयत्न करत तसं होऊ दिलं नाही आणि जनतेला महागाईपासून दिलासा दिला आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेला संबोधित करताना म्हटलं की, मोठे मोठे देश सध्या इंधन टंचाईचा सामना करत आहेत. मात्र, भारतानं प्रयत्नपूर्वक संकटावर मात केली आहे. भारतानं प्रत्येक स्तरावर योग्य निर्णय घेतले. संकटाचं योग्य वेळीच आकलन केलं. प्रभावी धोरण आणि भारताच्या संसाधनांचा संतुलित वापर केला, ज्यामुळं भारत संकटातून सावरला, असं मोदींनी म्हटलं.  

देशात हाहाकाराची स्थिती झाली असती- पीएम मोदी

नरेंद्र मोदी म्हणाले की,आपल्या गरजेच्या जवळपास 60 टक्के एलपीजी इतर देशांतून आयात केला जायचा, यापैकी 90 टक्के एलपीजी आखाती देशांमधून आणि होर्मुझमधून येत होता. अचानक युद्ध स्थिती निर्माण झाल्यानं तो तिथून होणारा पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता. तुम्हाला अंदाज असेल आपल्या देशात किती हाहाकाराची स्थिती निर्माण झाली असती. मात्र, सरकारनं संकट सुरु होताच रिफानयरीजच्या श्रमतेवर लक्ष केंद्रीत केलं आणि औद्योगिक कामांसाठी जो गॅस तयार व्हायचा त्याऐवजी रिफानयरीजना घरगुती वापरासाठी एलपीजी गॅस तयार करायला सांगितलं आणि सात दिवसात एलपीजीचं उत्पादन वाढलं.  

नरेंद्र मोदी म्हणाले की पहिल्यांदा 35000 मेट्रिक टन एलपीजीचं उत्पादन देशात व्हायचं, संकट काळात ते 54000 मेट्रिक टन पर्यंत वाढलं. ज्या रिफायनरीजनं पहिल्यांदा एलपीजी बनवला नव्हता तिथंही एलपीजी तयार केला. घरगुती गॅसच्या मागणीचा ताण एलपीजीवर येऊ नये यासाठी  पीएनजी कनेक्शनच्या वाढीसाठी अभियान राबवण्यात आलं. कमी वेळात भारतानं जवळपास 11 लाख पेक्षा अधिक घरांना पीएनजी कनेक्शन देण्यात आली, असं मोदी म्हणाले.  

घरगुती सिलेंडरचे दर 2 हजारांवर गेले असते: नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,आम्ही घरगुती ग्राहकांवर जास्त भार पडू दिला नाही. जी स्थिती होती, त्यामध्ये गॅस सिलेंडरचा दर 2000 रुपयांपर्यंत जाऊ शकत होते.  मोठे बाजार विश्लेषक हाच अंदाज वर्तवत होते. मात्र, आपल्या इथं घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर कमी केले जात आहेत. दोन दिवस अगोदर सरकारनं व्यावसायिक गॅसच्या दरांमध्ये मोठी कपात केली आहे. आमचं सरकार संवेदनशीलतेनं काम करत आहे, असंही मोदी म्हणाले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत भाष्य केलं आहे. युद्धाच्या कारणामुळं डिझेल आणि पेट्रोलवर मोठं संकट आलं होतं. आपल्या देशात मोठ्या मोठ्या तेल विहिरी नाहीयेत. संकट वाढलं तेव्हा क्रूड ऑईलचे दर 70 डॉलर प्रति बॅरलवरुन 120 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. आयातीचे मार्ग बंद होते. जगभरातील काही देशांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 40 ते 50 टक्के वाढ झाली होती. काही देशांमध्ये  डिझेल आणि पेट्रोल कोट्याच्या आधारावर मिळत होतं. एप्रिल ते जून दरम्यान पेट्रोल आणि डिझेलमुळं तेल कंपन्यांना 75000 कोटींचं नुकसान झालं आहे.  

सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क घटवलं : नरेंद्र मोदी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारनं पेट्रोलवरील 10 रुपयांनी एक्साईज ड्युटी प्रति लीटर कमी केलं आहे. युद्धाच्या दरम्यान भारतानं 40 हून अधिक देशांतून इंधन मागवण्यास सुरुवात केली. भारतानं जगाला स्पष्ट संदेश दिला की राष्ट्र हित आणि देशाच्या नागरिकांचं हित सर्वांच्या वर असल्याचं मोदी म्हणाले.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate Hike: अमेरिकेनं इराणवरी हल्ले थांबवताच सोने-चांदीच्या दरांत मोठी उसळी; सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यात, तर चांदीचे दर थेट 10 हजारांनी वाढले
सोन्या-चांदीच्या दरांत मोठी उसळी, सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यावर, तर चांदीचे दर 10 हजारांनी वाढले
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
Embed widget