एक्स्प्लोर

मोदींचा कॅशलेसचा नारा, पण ग्रामीण भागात जुनी बार्टर सिस्टीम

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर 'मन की बात' या कार्यक्रमातून कॅशलेस सोसायटी निर्माण करण्याचा संकल्प बोलून दाखवला. तरी ग्रामीण भागातून पारंपरिक देवाण-घेवाणीची वस्तूविनिमय पद्धत अर्थात बार्टर (Barter System) पद्धतीचा अवलंब अनेक ठिकाणी होत आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण भागाला चांगलाच फटका बसला आहे. नोटाबंदीमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, पश्चिम बंगालमधील एका छोट्याशा गावातील ग्रामस्थांनी, आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पारंपरिक वस्तूंविनिमयाचा (Barter System) मार्ग अवलंबला आहे. याबाबतचे वृत्त बीबीसीने प्रकाशित केले आहे. पश्चिम बंगालमधील बृंदावनपूरमधील ग्रामस्थांनी आपल्या गरजा भागवण्यासाठी एक किलो तांदळाच्या बदल्यात बटाटा, साखर, मीठ अशा दैनंदिन गरजा भागवण्यासाठी उपयोगी वस्तूंची देवाण-घेवाण करण्यास सुरुवात केली आहे. या गावातील ग्रामस्थ बिपक तारिणी सांगते की, ''नोटाबंदीचे संकट यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. पैशांच्या बदल्यात आम्हाला दुकानदार दोन किलो तांदूळ देतात. यातील एक किलो आम्ही दैनंदिन वापरासाठी ठेवतो, तर  उर्वरित एक किलो तांदळाचा वापर इतर वस्तू घेण्यासाठी करतो.'' नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक ठिकाणी शेतमजुरांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नाही. त्यामुळे शेतकरी देखील शेतमजुरांना त्यांना त्यांचा कामाचा मोबदला म्हणून त्या प्रमाणात धान्य देत आहेत. वस्तूंच्या या देवाण-घेवाणीच्या पद्धतीने ग्रामस्थांना तात्पूर्ता दिलासा मिळाला असला, तरी या गावात लवकरच पैसे पोहोचले नाहीत, तर परिस्थिती आणखीच बिकट होऊ शकते. दरम्यान, अशाच प्रकारे वस्तूंच्या देवाण-घेवाणीची पद्धत महराष्ट्रातही सुरु आहे. वर्ध्याच्या सेलू तालुक्यात ज्वारीचं फार कमी उत्पादन होतं, मात्र इथं ज्वारीला मोठी मागणी आहे. हेच ओळखून प्रफुल्ल जिरापुरे या तरुणाने ही देवाण-घेवाणीचा नवा व्यवसाय सुरु केला. मध्य-प्रदेशातून 15 रुपये किलोनं ज्वारी विकत घ्यायची. विदर्भातील गावागावात फिरून गव्हाच्या बदल्यात ती द्यायची. गहू बाजारात 20 रुपये किलोनं विकायचा. आणि किलोमागं 5 रुपये नफा कमवायचा. बेरोजगारीवर तरुणांनी असा उपाय शोधलाय. हंगामात 500 क्विंटल ज्वारीची देऊन एवढाच गहू ते घेतात. बाजारात गव्हाची विक्री करुन अडीच ते तीन लाखांचा नफा ते कमावतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 19 January 2024Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Embed widget