एक्स्प्लोर
महात्मा गांधींची 148 वी जयंती, दिग्गज नेत्यांची राजघाटावर हजेरी
पंतप्रधान मोदींसह माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 148 वी जयंती आहे. जयंतीनिमित्त दिल्लीच्या राजघाटावर आज सर्वपक्षीय नेते हजेरी लावत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेत्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
पंतप्रधान मोदींसह माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक नेत्यांनी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आणि काही वेळ ध्यानस्थ बसून त्यांच्या स्मृतींना वंदन केलं.
''गांधी जयंतीनिमित्त बापूंना वंदन. त्यांच्या महान आदर्शांनी जगाला प्रेरित केलं आहे'', अशा शब्दात मोदींनी आदरांजली वाहिली.
https://twitter.com/narendramodi/status/914652359204179968
माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचीही आज 113 वी जयंती आहे. देशभरात गांधीजींची आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली जात आहे. जवान आणि शेतकऱ्यांचे प्रणेते, देशाला कुशल नेतृत्त्व प्रदान करणाऱ्या शास्त्रींना वंदन, अशा शब्दात मोदींनी आदरांजली वाहिली.
https://twitter.com/narendramodi/status/914652654403510272
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement