देशातील महिलांना केंद्राकडून मिळणार 6 हजार रूपये, चार हप्त्यात पैसे थेट खात्यात
'प्रधानमंत्री मातृत्व वंदना' या योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिलांना 6 हजार रूपये देण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करू शकतात.
नवी दिल्ली : देशात क्रेंद्र सरकारकडून (Central Government) अनेक योजना चालवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक मदत केली जाते. केंद्र सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या अशाच एका योजनेच्या माध्यमातून देशभरातील महिलांच्या खात्यात 6 हजार रूपये जमा केले जातात.
'प्रधानमंत्री मातृत्व वंदना' योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदा गर्भधारणा झालेल्या महिलांना आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडून 6 हजार रूपये दिले जातात. ही योजना 1 जानेवारी 2017 रोजी सुरू करण्यात आली आहे. परंतु, अनेकांना अद्याप या योजनेबद्दल माहितीच नाही.
कोणाला मिळतात पैसे?
'प्रधानमंत्री मातृत्व वंदना' ही योजना गर्भवती महिलांसाठी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करू शकतात.
कोणती कागदपत्रे लागणार?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आई आणि वडिलांचे आधार कार्ड, आई-वडिलांचे ओळखपत्र, बाळाचा जन्माचा दाखला आणि बॅंक खात्याच्या पासबुकची आवश्यकता आहे.
चार टप्यात मिळतात पैसे
आई आणि बाळासाठी हे पैसे मिळतात. नवजात बालकाच्या वाढिसाठी आणि त्याचे आरोग्य चांगले राहावे यासाठी योग्य आहाराची गरज असते. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या पैशांच्या माध्यातून नवजात बालकाला योग्य आहार दिला जावा आणि त्याची वाढ व्यवस्थित व्हावी हाच या योजनेचा उद्देश आहे. 'प्रधानमंत्री मातृत्व वंदना' या योजनेचे पैसे सरकार चार टप्यात देते. यातील पहिला हप्ता एक हजार रूपये, दुसरा हप्ता दोन हजार, तिसरा हप्ता दोन हजार आणि शेवटच्या हप्त्यात एक हजार रूपये दिले जातात. यातील शेवटचा हप्ता बाळाच्या जन्मावेळी रूग्णालयात दिला जातो.
या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या साईटला भेट द्या.
महत्वाच्या बातम्या