MV Ganga Vilas: जगातील सर्वात लांब 'रिवर क्रूझ'चं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
Worlds Longest River Cruise-MV Ganga Vilas: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी येथे जगातील सर्वात लांब नदी क्रूझ-MV गंगा विलासला याचं लोकापर्ण झालं
Worlds Longest River Cruise-MV Ganga Vilas: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी येथे जगातील सर्वात लांब नदी क्रूझ-MV गंगा विलासला याचं लोकापर्ण झालं आहे. गंगा विलास क्रुझ...62 मीटर लांब...12 मीटर रुंद...तीन ओपन हॉल..फाईव्हस्टार हॉटेल्सच्या सर्व सुविधा. 18 स्पेशल सुविधांससह विशेष खोल्या...तसेच प्रवाशी आणि क्रु मेंबर्ससह 71 जणांसाठीची खास सोय..हीच गंगा विलास क्रुझ आता 51 दिवसांच्या ऐतिकहासिक प्रवासासाठी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्रूझला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
पंतप्रधान काय म्हणाले?
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आपल्या सणांमधील दान, श्रद्धा, तपस्या आणि श्रद्धेचे महत्व आणि त्यातील नद्यांची भूमिका यावर पंतप्रधानांनी भर दिला. यामुळे नदी जलमार्गाशी संबंधित प्रकल्प अधिक महत्वपूर्ण ठरतात असे ते म्हणाले. आज काशी ते दिब्रुगढ या सर्वात लांब रिव्हर क्रूझचा प्रारंभ होत असून यामुळे उत्तर भारतातील पर्यटनस्थळे जगाच्या पर्यटन नकाशावर येतील याकडे त्यांनी लक्ष वेधले. आज वाराणसी, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार, आसाम येथे 1000 कोटी रुपयांच्या इतर प्रकल्पांचे राष्ट्रार्पण होत आहे ,यामुळे पूर्व भारतातील पर्यटन आणि रोजगार क्षमतांना चालना मिळेल.
Beginning of cruise service on River Ganga is a landmark moment. It will herald a new age of tourism in India. https://t.co/NOVFLFrroE
— Narendra Modi (@narendramodi) January 13, 2023
क्रूझचा प्रवास कसा असेल?
13 जानेवारी रोजी ही क्रुझ वाराणसीतून निघेल..पुढे बिहारच्या पाटण्यातून पश्चिम बंगालच्या दिशेनं जाईल..त्यानंतर बंगालच्या उपसागरातून बांगलादेशात पोहोचेल..पुढे लहान मोठ्या नद्यांमधून गंगा विलास क्रुझ आसाममध्ये पोहोचेल..भारत आणि बांगलादेशामधील 5 राज्यातून ही क्रुझ जाणारय....आणि गंगा, यमुनेसह 27 नद्यांमधून 3 हजार 200 किलोमीटर अंतर पार करेल..आणि हीच सेवा 13 जानेवारीपासून सुरु होईल.. त्याचीच माहिती आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथाही दिली..दरम्यान, यामुळे जलवाहतूक आणि पर्यटनाला नवी गती मिळेल, असा विश्वास खुद्द पंतप्रधान मोदींनीही व्यक्त केला होता..
एमव्ही गंगा विलास
एमव्ही गंगा विलास उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून आपला प्रवास सुरू करेल आणि भारत, बांगलादेशातील 27 नदी प्रणाली ओलांडून बांगलादेशमार्गे आसाममधील दिब्रुगढला पोहोचण्यासाठी 51 दिवसांत सुमारे 3,200 कि.मीचा प्रवास करेल. एमव्ही गंगा विलासमध्ये सर्व लक्झरी सुविधांसह 36 पर्यटकांच्या क्षमतेचे तीन डेक आणि 18 सुइट्स आहेत. गंगा विलासच्या पहिल्या प्रवासाच्या संपूर्ण कालावधीसाठी स्वित्झर्लंडमधील 32 पर्यटक सहभागी होणार आहेत. देशातील सर्वोत्कृष्ट सुविधा जगासमोर आणण्यासाठी एमव्ही गंगा विलास क्रूझची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्या 51 दिवसांच्या प्रवासात ही रिव्हर क्रुझ जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नदी घाट तसेच बिहारमधील पाटणा, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बांगलादेशातील ढाका आणि आसाममधील गुवाहाटी यासारख्या प्रमुख शहरांसह 50 पर्यटन स्थळांना भेटी देणार आहे. या प्रवासामुळे पर्यटकांना भारत आणि बांगलादेशातील कला, संस्कृती, इतिहास आणि अध्यात्मात सहभागी होण्याची आणि शानदार प्रवास अनुभवण्याची संधी मिळणार आहे.