एक्स्प्लोर

PM Cares Fund: PM केअर्स फंडाकडे लोकांनी फिरवली पाठ, 2022-23 मध्ये फंडात झाली मोठी घसरण 

PM Cares Fund: संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी PM केअर्स फंडाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, 2022-23 या काळात PM केअर्स फंडात मोठी घसरण झाली आहे.

PM Cares Fund : कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी PM केअर्स फंडाची स्थापना करण्यात आली आहे. हा निधी आरोग्य आणीबाणीसाठी मदत करणे, आरोग्य सेवा क्षेत्र अपग्रेड करणे किंवा कोणत्याही संबंधित संशोधनासाठी देण्यात येतो. मात्र, 2022-23 या आर्थिक वर्षात PM केअर्स फंडाच्या रकमेत मोठी घट झाली आहे. PM केअर्स फंडाकडे लोकांनी फिरवली पाठ फिरवल्याचे दिसत आहे. कारण, 2022-23 या आर्थिक वर्षात PM केअर्स फंडात 912 कोटी रुपये जमा झालेत. 2021-22 मध्ये 1938 कोटी रुपये जमा झाले होते. या वर्षाच्या तुलने 2022-23 मध्ये खूप कमी रक्कम जमा झाली आहे. 

पीएम केअर्स फंडातील एकूण ऐच्छिक योगदान 2022-23 या आर्थिक वर्षात 912 कोटी रुपयांवर घसरले आहे. कोरोनाच्या संकटानंतर मार्च 2020 मध्ये या सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टच्या स्थापनेपासूनची ही सर्वात कमी रक्कम आहे. त्यामुळं कोविडच्या कालावधीनंतर, लोक, संस्था आणि परदेशी देणगीदारांनी पीएम केअर फंडमध्ये आर्थिक योगदान कमी केले आहे.

2020-21 मध्ये पीएम केअर्स फंडात सर्वाधिक योगदान 

पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत (पीएम केअर्स) फंडाच्या वेबसाइटवर प्रदान केलेल्या लेखापरीक्षण तपशीलांवरून असे दिसून आले आहे की 2020-21 मध्ये ऐच्छिक योगदानाने 7184 कोटी रुपयांचा उच्चांक गाठला होता. यानंतर 2021-22 मध्ये हे योगदान 1,938 कोटी रुपये झाले होते. 2022-23 मध्ये त्यात आणखी घट झाली आहे. या काळात पीएम केअर्स फंडात  912 कोटी रुपये जमा झाले आहेत. 

पीएम केअर्स फंडातील परदेशी योगदानात मोठी घट

परदेशी योगदानामध्येही मोठी घट झाली आहे. 2020-21 मध्ये पीएम केअर्स फंडात परदेशी योगदान 495 कोटी रुपये होते. हे योगदान पुढील दोन वर्षांत अनुक्रमे 40 कोटी आणि 2.57 कोटी रुपयांवर घसरले आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण खर्च अंदाजे 439 कोटी रुपये होता. त्यातील 346 कोटी रुपये 'पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन'ने वापरले होते. कोविड महामारीमध्ये ज्यांनी आपले पालकगमावले आहेत अशा मुलांना मदत करण्यासाठी हा सरकारी उपक्रम आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीवर अंदाजे 92 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 439 कोटी रुपये वितरित 

जोपर्यंत पेमेंट आणि वितरणाचा संबंध आहे, पीएम केअर्स फंडाने 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 439 कोटी रुपये वितरित केले आहेत. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेनसाठी 346 कोटी रुपये, 99,986 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या खरेदीसाठी 91.87 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : तर कोणत्याही ग्रहावर असला, तरी आम्ही शोधून काढून 'शिकार' करु! एफबीआय संचालक होताच काश पटेलांचा नेमका इशारा कोणाला?
तर कोणत्याही ग्रहावर असला, तरी आम्ही शोधून काढून 'शिकार' करु! एफबीआय संचालक होताच काश पटेलांचा नेमका इशारा कोणाला?
PHOTO: बॉलीवूडचा संगीतकार थेट योगी आदित्यनाथांना भिडला, म्हणाला, 'हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा'
बॉलीवूडचा संगीतकार थेट योगी आदित्यनाथांना भिडला, म्हणाला, 'हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा'
Sharad Pawar : वाजपेयींचं सरकार एक मताने पाडलं, ते एक मत कसं मिळवलं, शरद पवारांनी पहिल्यांदाच किस्सा सांगितला!
वाजपेयींचं सरकार एक मताने पाडलं, ते एक मत कसं मिळवलं, शरद पवारांनी पहिल्यांदाच किस्सा सांगितला!
Eknath Shinde Death Threat: एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, मामा भाच्याच्या जोडीला अटक
एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, मामा भाच्याच्या जोडीला अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 21 February 2025Ideas of India 2025 : एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक Atideb Sarkar यांचं भाषणABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 February 2025Jalna CIDCO Project News | जालन्यातील चौकशीचे आदेश दिलेल्या सिडकोचा प्रकल्प नेमका आहे तरी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : तर कोणत्याही ग्रहावर असला, तरी आम्ही शोधून काढून 'शिकार' करु! एफबीआय संचालक होताच काश पटेलांचा नेमका इशारा कोणाला?
तर कोणत्याही ग्रहावर असला, तरी आम्ही शोधून काढून 'शिकार' करु! एफबीआय संचालक होताच काश पटेलांचा नेमका इशारा कोणाला?
PHOTO: बॉलीवूडचा संगीतकार थेट योगी आदित्यनाथांना भिडला, म्हणाला, 'हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा'
बॉलीवूडचा संगीतकार थेट योगी आदित्यनाथांना भिडला, म्हणाला, 'हिंमत असेल तर गंगेतील पाण्याचा एक घोट पिऊन दाखवा'
Sharad Pawar : वाजपेयींचं सरकार एक मताने पाडलं, ते एक मत कसं मिळवलं, शरद पवारांनी पहिल्यांदाच किस्सा सांगितला!
वाजपेयींचं सरकार एक मताने पाडलं, ते एक मत कसं मिळवलं, शरद पवारांनी पहिल्यांदाच किस्सा सांगितला!
Eknath Shinde Death Threat: एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, मामा भाच्याच्या जोडीला अटक
एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, मामा भाच्याच्या जोडीला अटक
Satara News : साताऱ्यात माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच दिली खुनाची सुपारी; इचलकरंजीमधील जर्मनी गँगच्या सातारा पोलिसांना मुसक्या आवळल्या, खुनाचा कट उधळला
साताऱ्यात माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच दिली खुनाची सुपारी; इचलकरंजीमधील जर्मनी गँगच्या सातारा पोलिसांना मुसक्या आवळल्या, खुनाचा कट उधळला
अमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांच्या घटस्फोटित पत्नीकडून 164550 कोटींचं दान, मॅकेंझी स्कॉटकडे किती संपत्ती राहिली?
अमेझॉनच्या मालकाच्या घटस्फोटित पत्नीकडून दीड लाख कोटींचं दान, मॅकेंझी स्कॉटकडे इतकी संपत्ती शिल्लक
Sanjay Raut : अजित पवार सोडा, फडणवीसांनीच मुंडे, कोकाटेंचा राजीनामा घ्यावा; संजय राऊत कडाडले, सुरेश धसांनाही डिवचलं
अजित पवार सोडा, फडणवीसांनीच मुंडे, कोकाटेंचा राजीनामा घ्यावा; संजय राऊत कडाडले, सुरेश धसांनाही डिवचलं
अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना फडणवीस सरकारचा दणका, नव्याने अर्ज सादर करण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना फडणवीस सरकारचा दणका, नव्याने अर्ज सादर करण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Embed widget