एक्स्प्लोर
VIDEO : पिटबुल कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुरड्यासह तिघे जखमी
पिटबुल जातीच्या कुत्र्याने एका चिमुरड्यासह काही स्थानिकांवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील उत्तमनगरमध्ये एका छोट्याशा कुत्र्याने रहिवाशांना जीव नकोसा केला. पिटबुल जातीच्या कुत्र्याने एका चिमुरड्यासह काही स्थानिकांवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
पिटबुल कुत्र्याच्या हल्ल्यात तिघं जण जखमी झाले आहेत. 'एएनआय'च्या माहितीनुसार ही घटना 28 मार्चला दिल्लीतील उत्तमनगर भागातल्या एका गल्लीत घडली.
व्हिडिओत एक कुत्रा धावत येताना दिसतो. त्यानंतर त्याने एका लहान मुलावर हल्ला चढवला. मुलाला वाचवण्यासाठी एक महिला धावली. कोणी त्याला काठी मारली, तर कोणी खुर्ची, मात्र कुत्रा काही केल्या थांबत नव्हता.
अखेर, लहानग्याला कुत्र्याच्या तावडीतून वाचवण्यात आलं. मात्र कुत्रा सैरावैरा इतरांच्या मागे पळतच आहे.
हा कुत्रा अमेरिका आणि ब्रिटनमध्ये आढळणाऱ्या पिटबुल टेरियर जातीचा आहे.
#WATCH Three injured after being attacked by a Pitbull Terrier in Delhi's Uttam Nagar. (28.3.18) pic.twitter.com/9Y9rBR2NIi
— ANI (@ANI) April 2, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement