एक्स्प्लोर
Advertisement
मध्य प्रदेशातल्या शिवपुरी धबधब्यात 11 जण वाहून गेले!
11 जण बुडाले असून अजूनही 34 जण पाण्यामध्ये फसलेले आहेत, त्यांच्या बचावासाठी हेलिकॉप्टरनं बचावकार्य सुरू आहे.
शिवपुरी : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनिमित्त धबधब्यावर पिकनिकसाठी गेलेल्या 11 तरुणांचा बुडून मृत्यू झालाय. मध्यप्रदेशातील शिवपुरी धबधब्यावर ही घटना घडली आहे. 11 जण बुडाले, तर 20 जणांना वाचवण्यात यश आले आहे. अजूनही 34 जण पाण्यामध्ये फसलेले आहेत, त्यांच्या बचावासाठी हेलिकॉप्टरनं बचावकार्य सुरु आहे.
शिवपुरी आणि ग्वाल्हेर जिल्ह्यांच्या सीमेवरील मोहना गावाजवळ शिवपुरी धबधबा आहे.
रात्र झाल्यानं रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोठे अडथळे येत आहेत. धबधब्याचा प्रवाह खूप जास्त असल्यानं पाण्यात जाऊ नका, असा इशारा आधीच या मुलांना दिला होता. मात्र तरीसुद्धा त्याकडे कानाडोळा करत या मुलांची मस्ती सुरु झाली आणि त्यात 11 जणांना जीव गमवावा लागला.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवरुन माहिती दिली की, “शिवपुरी धबधब्यात फसलेल्यांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत सात जणांना वाचवण्यात यश आले आहे.”
ही घटना घडल्यानंतर केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर तातडीने घटनास्थळी पोहोचले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement