एक्स्प्लोर

पाकिस्तानपेक्षा भारतात पेट्रोल 33 रुपये प्रति लिटरने महाग कशामुळे?

पेट्रोल आज 33 पैशांनी तर डिझेल 15 पैशांनी वाढलं. इंधनाचे दर पैशात वाढत असले, तरी त्याचा परिणाम रुपयात होतो. त्यामुळे मुंबईत या घडीला पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 73 पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये 36 पैसे झाले आहेत.

मुंबई : कर्नाटक निवडणुकीनंतर सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. कर्नाटकमध्ये प्रचार संपतो ना संपतो तोच, इकडे तोटा भरुन काढण्याच्या नावाखाली पेट्रोल- डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. पेट्रोल आज 33 पैशांनी तर डिझेल 15 पैशांनी वाढलं. इंधनाचे दर पैशात वाढत असले, तरी त्याचा परिणाम रुपयात होतो. त्यामुळे मुंबईत या घडीला पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 73 पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये 36 पैसे झाले आहेत. तर दिल्लीत पेट्रोल 76.87 रुपये तर डिझेल 68 रुपये प्रति लिटर झालं आहे. या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे आणि रुपयाचं मूल्य कमी झाल्यामुळे इंधन दर भारतात वाढले आहेत. मात्र दरवाढीला कारणीभूत यापेक्षाही महत्त्वाचं कारण आहे, केंद्र सरकारची एक्साईज ड्युटी आणि विविध राज्यांमध्ये लागणारे कर आणि सेस. दिल्ली सरकारने लावलेले सर्व कर काढून टाकले, तर दिल्लीत पेट्रोलचे दर निम्म्यापेक्षाही खाली येतील. शेजारच्या देशांमध्ये स्वस्त पेट्रोल पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे भारताची तुलना शेजारच्या राष्ट्रांशी होऊ लागली आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, सार्क (SAARC) देशांमध्ये भारत वगळता, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, भूटान आणि बांगलादेशमध्ये पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त आहे. भारतापेक्षा गरीब देश स्वस्त दरांमध्ये पेट्रोल देऊ शकतात, तर भारताला काय हरकत आहे? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून मिळणारा महसूल वाढवण्याचा सरकारचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळेच राज्यांचे कर आणि केंद्राची एक्साईज ड्युटी यामुळे सर्वसामान्यांना झळ सोसावी लागत आहे. शेजारच्या राष्ट्रांमध्ये पेट्रोलची प्रति लिटर किंमत पाकिस्तान- 51.79 नेपाळ- 67.46 श्रीलंका- 64 भूटान- 57.24 अफगाणिस्तान- 47 बांगलादेश- 71.55 चीन- 81 म्यानमार- 44 (14 मे 2018 पर्यंतची आकडेवारी, स्रोत-ग्लोबल पेट्रोल प्राईस)

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget