एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती जारी; खिशाला कात्री की, दिलासा?

Petrol-Diesel Price Today Latest Updates : गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट होण्याऐवजी आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Petrol Diesel Rate Today 28 December 2021 : पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जवळपास 2 महिन्यांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किमती स्थिर आहेत. केंद्र सरकारद्वारे दिवाळी दरम्यान, पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट करण्यात आली होती. त्यानंतरपासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. 

गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या ट्रेडिंग सत्रात, जागतिक मानक मानल्या जाणार्‍या ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 1.01 टक्क्यांनी वाढून $76.07 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, जागतिक स्तरावर, न्यूयॉर्कमध्ये वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्च्या तेलाच्या किमती 1.42 टक्क्यांनी वाढून $73.79 प्रति बॅरलवर पोहोचल्या. 

भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. आजही तेलाच्या किमती स्थिर आहेत. राजधानी दिल्लीसह देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती गेल्या दीड महिन्यांपासून बदल करण्यात आलेला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्या महिन्याभरात तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. 

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.  

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे. 

देशात ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी इंधानाच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. जाणून घेऊया वेगवेगळ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती 

देशातील प्रमुख शहरं  पेट्रोलची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर 
मुंबई 109.98  94.14
दिल्ली 95.41  86.67
चेन्नई 101.40 91.43
कोलकाता 104.67 89.79
पाटणा 105.92 91.09

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं!
SPY Universe : सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
Beed : बीड जिल्ह्यातील भाजप मराठा कार्यकर्त्याचे पक्षासोबतच राहणार असल्याचे थेट बॉण्डवर शपथपत्र; इतर कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
बीड जिल्ह्यातील भाजप मराठा कार्यकर्त्याचे पक्षासोबतच राहणार असल्याचे थेट बॉण्डवर शपथपत्र; इतर कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
Shivadi Vidhan  Sabha: उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन लालबागचा राजाची... 'या' कारणामुळे सुधीर साळवींना उमेदवारी मिळाली नाही, आशिष शेलारांची थिअरी
उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन लालबागचा राजाची... 'या' कारणामुळे सुधीर साळवींना उमेदवारी मिळाली नाही, आशिष शेलारांची थिअरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Mahim Constituency : माहीमची डील का झाली नाही? मनसे-शिवसेनेची इनसाईड स्टोरीAkbaruddin Owaisi On Assembly Election 2024 : शिंदे आणि फडणवीस सरकारला हरवणं आमचं लक्ष्यABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 November 2024Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं!
शिवसेना, धनुष्यबाण तुमची प्रॉपर्टी नाही; राज ठाकरेंनी ठणकावलं; एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं!
SPY Universe : सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
सलमान खान, शाहरुख खान की ह्रतिक रोशन; YRF स्पाय युनिव्हर्समधील महागडा अभिनेता कोण?
Beed : बीड जिल्ह्यातील भाजप मराठा कार्यकर्त्याचे पक्षासोबतच राहणार असल्याचे थेट बॉण्डवर शपथपत्र; इतर कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
बीड जिल्ह्यातील भाजप मराठा कार्यकर्त्याचे पक्षासोबतच राहणार असल्याचे थेट बॉण्डवर शपथपत्र; इतर कार्यकर्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
Shivadi Vidhan  Sabha: उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन लालबागचा राजाची... 'या' कारणामुळे सुधीर साळवींना उमेदवारी मिळाली नाही, आशिष शेलारांची थिअरी
उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन लालबागचा राजाची... 'या' कारणामुळे सुधीर साळवींना उमेदवारी मिळाली नाही, आशिष शेलारांची थिअरी
Sharda Sinha Passes Away: बिहारची गानकोकीळा शारदा सिन्हा कालवश; 'मैंने प्यार किया', 'गँग्ज ऑफ वासेपूर 2' सह असंख्य चित्रपटांसाठी पार्श्वगायन
बिहारची गानकोकीळा शारदा सिन्हा कालवश; 'मैंने प्यार किया', 'गँग्ज ऑफ वासेपूर 2' सह असंख्य चित्रपटांसाठी पार्श्वगायन
Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरे म्हणाले, शिवसेना, धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Embed widget