Petrol-Diesel Price Today : इंधन दरात दिलासा मिळणार? जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
Petrol-Diesel Price 03 January 2022 : इंधन कंपन्यांनी नववर्षाच्या चौथ्या दिवशी ग्राहकांना दिलासा दिला आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
Petrol-Diesel Price Today 4 January 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) जारी केले आहेत. IOCL ने जारी केलेल्या माहितीनुसार, आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. जवळपास दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशात गेल्या दोन महिन्यांपासून तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. राजधानी दिल्लीसह देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बदल करण्यात आलेला नाही.
भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्या दोन महिन्यांत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.
IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे.
देशात ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी इंधानाच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. जाणून घेऊया वेगवेगळ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती
देशातील प्रमुख शहरं | पेट्रोलची किंमत प्रति लिटर | डिझेलची किंमत प्रति लिटर |
मुंबई | 109.98 | 94.14 |
दिल्ली | 95.41 | 86.67 |
चेन्नई | 101.40 | 91.43 |
कोलकाता | 104.67 | 89.79 |
पाटणा | 105.92 | 91.09 |
देशात सर्वाधिक दर कोणत्या शहरात