Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे दर आठ महिन्यांपासून स्थिर, 'या' शहरात विकलं जातंय सर्वात स्वस्त इंधन; जाणून घ्या आजचे दर
Petrol Diesel Price Today: पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर...
Petrol Diesel Price Today 20th January 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price) चढ-उतार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी घसरण सुरु असलेल्या कच्च्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरवाढीचा परिणाम भारतातील पेट्रोल, डिझेलच्या दरावर झाला नसल्याचे चित्र आहे. आज सकाळी इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल, डिझेलचे दर (Today's Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. 22 मे पासून पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
देशातील इंधन कंपन्या सकाळी सहा वाजता पेट्रोल डिझेलचे दर जाहीर करतात. मुंबई, चेन्नई, दिल्ली, कोलकातासह देशातील अन्य शहरातील पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये लिटर तर डिझेल 89.62 रुपये लिटर आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर
- नागपूर: पेट्रोल 106.65 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.18 रुपये प्रति लिटर
- पुणे: पेट्रोल 105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर: पेट्रोल 106.18 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.71 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद: पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
- परभणी: 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.85 रुपये प्रति लिटर
देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोलचा दर 106.3 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
देशात महाग पेट्रोल गंगानगमध्ये
देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल अंदमान आणि निकोबारमधील आहे. पोर्ट ब्लेअर इथे पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेलची 79.74 रुपये प्रति लिटर दराने विक्री केली जात आहे. याशिवाय देशातील सर्वात महाग पेट्रोल राजस्थानमधील गंगानगरमध्ये आहे. गंगानगरमध्ये पेट्रोल 113.48 रुपये आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किमती एका क्लिकवर जाणून घ्या
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर पाहता येऊ शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) पाहता येतील.