एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत घट; मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम नाही, एक लिटरचे दर काय?

Petrol and Diesel Price in India : भारतीय तेल कंपन्यांनी 3 नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आज सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

Petrol and Diesel Price in India : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर घट पाहायला मिळत आहे. अशातच देशात मात्र पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) च्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सलग तेराव्या दिवशी इंधनाच्या किमती स्थिर असून इंधन दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही इंधनाचे दर स्थिर आहेत. जाणून घेऊया देशातील पेट्रोल डिझेलच्या दरांची स्थिती.

भारतीय तेल कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) नं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत  94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत (Petrol Price);103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत  86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे. 

राज्यस्थान सरकारकडून पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात 

नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट करण्यात आली होती. त्यानंतर अनेक राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींपासून दिलासा दिला होता. दरम्यान, अनेक राज्य अशी होती की, ज्यांनी व्हॅटमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. अशातच मंगळवारी राजस्थान सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल 4 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 5 रुपये प्रति लिटरनं स्वस्त करण्यात आलं आहे. 

देशातील अनेक शहरांत एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पार 

मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लद्दाखमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. मुंबईतील पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. 

देशातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price ) काय?

देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
मुंबई  109.98 94.14
दिल्ली 109.69  98.24
कोलकाता  104.67  89.79
चेन्नई  101.40 91.43

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : बसच्या भीषण अपघातात 6 ठार, 35 जखमी; ड्रायव्हर रील करत होता, सांगूनही थांबला नाही, आता फरार झाला
बसच्या भीषण अपघातात 6 ठार, 35 जखमी; ड्रायव्हर रील करत होता, सांगूनही थांबला नाही, आता फरार झाला
Maharashtra Vidhansabha Election 2024: विधानसभेची खडाजंगी: अलिबाग विधानसभा मतदारसंघात काँग्रेस अन् शेकापमध्ये रस्सीखेच; महायुती की महाविकास आघाडी, यंदा कोण मारणार बाजी?
अलिबाग विधानसभा मतदारसंघात काँग्रेस अन् शेकापमध्ये रस्सीखेच; महायुती की महाविकास आघाडी, यंदा कोण मारणार बाजी?
तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट; जयंत पाटील म्हणाले, इंदापूरचं शिवधनुष्य...
तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट; जयंत पाटील म्हणाले, इंदापूरचं शिवधनुष्य...
इंदापूरला निघण्यापूर्वीच फोन, शरद पवारांनी सांगितला किस्सा; रामराजेही अजित पवारांना देणार धक्का?
इंदापूरला निघण्यापूर्वीच फोन, शरद पवारांनी सांगितला किस्सा; रामराजेही अजित पवारांना देणार धक्का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा ABP MajhaMumbai Metro Line 3 Update : मेट्रो मार्गिका 3 ची भुयारी सफर मुंबईकरांना कशी वाटली #abpमाझाChhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये 'बुद्धलेणी बचाव'साठी मोर्चाHarshavardhan Patil Speech : दादा, फडणवीस की भाजपची दडपशाही?भरसभेत हर्षवर्धन पाटलांनी कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : बसच्या भीषण अपघातात 6 ठार, 35 जखमी; ड्रायव्हर रील करत होता, सांगूनही थांबला नाही, आता फरार झाला
बसच्या भीषण अपघातात 6 ठार, 35 जखमी; ड्रायव्हर रील करत होता, सांगूनही थांबला नाही, आता फरार झाला
Maharashtra Vidhansabha Election 2024: विधानसभेची खडाजंगी: अलिबाग विधानसभा मतदारसंघात काँग्रेस अन् शेकापमध्ये रस्सीखेच; महायुती की महाविकास आघाडी, यंदा कोण मारणार बाजी?
अलिबाग विधानसभा मतदारसंघात काँग्रेस अन् शेकापमध्ये रस्सीखेच; महायुती की महाविकास आघाडी, यंदा कोण मारणार बाजी?
तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट; जयंत पाटील म्हणाले, इंदापूरचं शिवधनुष्य...
तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट; जयंत पाटील म्हणाले, इंदापूरचं शिवधनुष्य...
इंदापूरला निघण्यापूर्वीच फोन, शरद पवारांनी सांगितला किस्सा; रामराजेही अजित पवारांना देणार धक्का?
इंदापूरला निघण्यापूर्वीच फोन, शरद पवारांनी सांगितला किस्सा; रामराजेही अजित पवारांना देणार धक्का?
Rahul Gandhi In Kolhapur : आम्ही काय खातो कोणालाच माहीत नाही; राहुल गांधी म्हणाले, म्हणून मी बघायला आलोय! कोल्हापुरात दलित कुटुंबाच्या घरी गेल्यानंतर काय घडलं?
Video : आम्ही काय खातो कोणालाच माहीत नाही; राहुल गांधी म्हणाले, म्हणून मी बघायला आलोय! कोल्हापुरात दलित कुटुंबाच्या घरी गेल्यानंतर काय घडलं?
Jayant Patil : दिल्लीश्वरांचे शरद पवारसाहेबांना नमवण्याचे आटोकाट प्रयत्न, सर्व मार्ग वापरले, ईडीची नोटीस आली, जयंत पाटील यांनी सगळंच काढलं
दिल्लीवाल्यांनी जेव्हा जेव्हा जबरदस्ती केली तेव्हा शरद पवारसाहेबांनी मराठी स्वाभिमान दाखवला : जयंत पाटील
अटल सेतू ठरतोय श्रीमंत अन् व्यवसायिकांचा लाडका; महागड्या टोलमुळे 70 टक्के कमी वाहतूक
अटल सेतू ठरतोय श्रीमंत अन् व्यवसायिकांचा लाडका; महागड्या टोलमुळे 70 टक्के कमी वाहतूक
Shrikant Shinde : उद्धव ठाकरेंकडून 'मुख्यमंत्र्यांचं कार्ट' म्हणून उल्लेख, आता श्रीकांत शिंदेंचं जशास तसं उत्तर, म्हणाले...
उद्धव ठाकरेंकडून 'मुख्यमंत्र्यांचं कार्ट' म्हणून उल्लेख, आता श्रीकांत शिंदेंचं जशास तसं उत्तर, म्हणाले...
Embed widget