मुख्यपृष्ठबातम्याभारतPetrol-Diesel Price : रशिया-युक्रेन युद्धामुळं कच्च्या तेलाचे दर सर्वोच्च स्तरावर; देशात पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?
Petrol-Diesel Price : रशिया-युक्रेन युद्धामुळं कच्च्या तेलाचे दर सर्वोच्च स्तरावर; देशात पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?
Petrol-Diesel Price Today 2 March 2022 : रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीने 110 डॉलर प्रति बॅरेलचा टप्पा ओलांडला आहे. अशातच देशातही पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
By : एबीपी माझा वेब टीम | Edited By: श्रद्धा भालेराव | Updated at : 03 Mar 2022 07:56 AM (IST)
Petrol-Diesel Price Today 3 March 2022
Petrol-Diesel Price Today 3 March 2022 : रशिया-युक्रेन युद्धाचा आजचा आठवा दिवस. गेले सात दिवस युक्रेन आणि रशिया या दोन युरोपियन राष्ट्रांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धाचे परिणाम हळूहळू जगातल्या सर्वच देशात दिसू लागले आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्या आहेत. पण याचा परिणाम भारतीय बाजारात झाल्याचं दिसत नाही. भारतात गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Prices) स्थिर आहेत.
रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीने 110 डॉलर प्रति बॅरेलचा टप्पा ओलांडला आहे. त्याचा परिणाम देशातील इंधनावर होण्याची शक्यता आहे. पण सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका असल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. अशातच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर, म्हणजे 7 मार्च नंतर देशातील पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या (Diesel) किंमतीचा भडका उडण्याची शक्यता आहे. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये 9 ते 10 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरल पार पोहोचले आहेत. कच्च्या तेलाचे भाव 110 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहेत. तर ब्रेंट क्रूड ऑईल 110 डॉलर प्रति बॅरेल तर डब्ल्यूटीआय ऑईलच्या किंमती 108 डॉलर प्रति बॅरेल पार पोहोचल्या आहेत. डब्ल्यूटीआय ऑईल ऑगस्ट 2014 नंतर पहिल्यांदाच 108 डॉलर प्रति बॅरेल पार पोहोचले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. तरिदेखील देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती तीन महिन्यांपासून स्थिर आहेत. अशातच देशात निवडणुकांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं बोललं जात आहे. देशातील सर्वच महानगरांपैकी सर्वाधिक दर मुंबईत आहेत. मुंबईत पेट्रोल 110 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.
देशातील महानगरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुबंई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलची सर्वाधिक किंमत मुंबईमध्ये असून प्रति लिटर 110 रुपयांनी मुंबईत पेट्रोल विकण्यात येत आहे. दिल्लीव्यतिरिक्त कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटर पार पोहोचलं आहे. तेल कंपन्यांनी 4 नोव्हेंबरपासून या महानगरांतील किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सरकारने 15 जून 2017 पासून बाजारात तेलाच्या किमती लागू केल्या आहेत, ज्यावरून त्यांचे दर दररोज निश्चित केले जातात.
देशात चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय?
दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर
चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर
महाराष्ट्रात एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अद्यापही शंभरीपार आहेत. जाणून घेऊयात मुंबई, पुण्यापासून नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत...
राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती :
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).