एक्स्प्लोर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घटले; देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीही कमी होणार?

Petrol-Diesel Price Today 2nd June : भारतीय तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले असून आज देशातील दर स्थिर आहेत.

Petrol-Diesel Price Today 2nd June : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत आज मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. हे संकेत भारतीय बाजारासाठी चांगले असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र, देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. आज देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel) स्थिर आहेत. आज सलग 13 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत आणि 22 मे पासून त्यात कोणताही बदल झालेला नाही. 

आजचे कच्च्या तेलाचे दर 

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत घसरण झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड 3.30 डॉलर किंवा 2.86 टक्क्यांनी वाढल्यानंतर प्रति बॅरल 112 डॉलरवर व्यापार करत आहे. त्याच वेळी, बेंचमार्क ब्रेंट क्रूड 3.18 डॉलर किंवा 2.73 टक्क्यांच्या उडीसह प्रति बॅरल 113.1 डॉलरवर व्यापार करत आहे.

केंद्र सरकारनं 21 मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट केली होती. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी घट पाहायला मिळाली होती. तेव्हापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) किमती स्थिर आहेत. 

देशातील महानगरांतील किमती काय? 

आज मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर मिळत आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तसेच चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय? 

महाराष्ट्रातील मुंबई शहरात गुरुवारी पेट्रोलचा दर 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, बृहन्मुंबईमध्ये, पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.53 रुपये आणि डिझेलचा दर 97.45 रुपये प्रति लिटर आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.93 रुपये तर डिझेलचा दर 96.38 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.25 रुपये तर डिझेलचा दर 95.73 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर 95.92 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर 95.54 रुपये प्रति लिटर आहे.

सर्वात स्वस्त, सर्वात महाग पेट्रोल-डिझेल मिळतंय कुठे? 

देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 79.74 प्रति लिटर आहे. तर, आजही देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये 114.38 रुपये प्रति लिटर आणि आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये 100.30 रुपये प्रति लिटर आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Delhi Congress protest : संसद भवनाबाहेर राजकारणतला 'दे धक्का'चा अंकSpecial Report Mumbai BJP Protest:कार्यालय,सोनियांच्या पोस्टरवर शाईफेक,भाजप कार्यकर्त्यांकडून दगडफेकSpecial Report Laxman Savadi:कर्नाटक विधानसभेत काँग्रेस आमदाराची मुक्ताफळ,मुंबईवर दावा करेपर्यंत मजलSpecial Report on Mumbai Congress vs BJP : काँग्रेस vs भाजप कार्यकर्ते चिडले, एकमेकांशी भिडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Nanded Suicide : मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Embed widget