एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price Today : युक्रेन-रशिया तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर कडाडले; देशात पेट्रोल-डिझेलची स्थिती काय?

IOCL, Petrol-Diesel Price Today 23 February 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार, देशातील किमती मात्र स्थिर. जाणून घ्या तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर.

IOCL, Petrol-Diesel Price Today 23 February 2022 : रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणावाचे परिणाम संपूर्ण जगावर होत असल्याचं दिसत आहे. युक्रेनवर रशियन यांच्यातील तेढ सध्या वाढत असून त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवरही होत आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर (Crude Oil Prices) 100 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास पोहोचलं आहे. परंतु, देशांतर्गत स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सलग तीन महिन्यांपासून स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 

देशात 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. तरिदेखील देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती तीन महिन्यांपासून स्थिर आहेत. अशातच देशात निवडणुकांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं बोललं जात आहे. देशातील सर्वच महानगरांपैकी सर्वाधिक दर मुंबईत आहेत. मुंबईत पेट्रोल 110 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. 

महाराष्ट्रात एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अद्यापही शंभरीपार आहेत. जाणून घेऊयात मुंबई, पुण्यापासून नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत...

राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती : 
प्रमुख शहरं पेट्रोलची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर
मुंबई 109.98 रुपये प्रति लिटर  94.14 रुपये प्रति लिटर
ठाणे 110.12 रुपये प्रति लिटर  94.28  रुपये प्रति लिटर
पुणे 109.72 रुपये प्रति लिटर  92.50 रुपये प्रति लिटर
नाशिक 109.79 रुपये प्रति लिटर 92.57 रुपये प्रति लिटर
नागपूर 110.10 रुपये प्रति लिटर 92.90 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर 109.66 रुपये प्रति लिटर  92.48 रुपये प्रति लिटर
अहमदनगर 110.12  रुपये प्रति लिटर  92.90 रुपये प्रति लिटर
अमरावती 111.14 रुपये प्रति लिटर  93.90 रुपये प्रति लिटर
 
देशातील महानगरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुबंई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलची सर्वाधिक किंमत मुंबईमध्ये असून प्रति लिटर 110 रुपयांनी मुंबईत पेट्रोल विकण्यात येत आहे. दिल्लीव्यतिरिक्त कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटर पार पोहोचलं आहे. तेल कंपन्यांनी 4 नोव्हेंबरपासून या महानगरांतील किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सरकारने 15 जून 2017 पासून बाजारात तेलाच्या किमती लागू केल्या आहेत, ज्यावरून त्यांचे दर दररोज निश्चित केले जातात.

देशात चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय? 

  • दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर
  • मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर
  • चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस; गैरव्यवहारामुळं मोठा निर्णय होणार?
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार? कृषी आयुक्तांच्या समितीची शिफारस, नेमकं कारण काय?
मोठी बातमी: राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
राज्यातील 32 जात वैधता प्रमाणपत्र समित्यांना अध्यक्षच नाही, महायुती सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा काँग्रेसचा आरोप
Embed widget