एक्स्प्लोर

Petrol Price Today : जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट; जाणून घ्या देशातील पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Price Today : जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. मात्र देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती अद्याप स्थिर आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय?

Petrol-Diesel Price Today 20th September Latest Updates : गेल्या आठवड्यातील दरवाढीनंतर विदेशी बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत सलग घट होत आहे. सोमवारी जगातील सर्वात मोठी कंपनी गल्फ ऑफ मेक्सिकोनं कच्च्या तेलाच्या उत्पादन सुरु केलं आहे. या वृत्तानंतर आंतरराष्ट्रीय स्तरांवर कच्च्या तेलाच्या किमतीत 3 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. दरम्यान, याचा परिणाम देशांतर्गत किमतींमध्ये दिसून येत नाही. देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी (OMCs) IOC नं सलग 15व्या दिवशी म्हणजेच, 20 सप्टेंबर 2021 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, तज्ज्ञांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत देशात पेट्रोलच्या किमतींमध्ये मोठी घट होऊ शकते. 

देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, देशातील प्रमुख महानगरांपैकी सर्वाधिक दर मुंबईत आहेत. देशाच्या राजधानीच्या शहरात पेट्रोलच्या किमती 101.19 रुपये आणि डिझेलच्या किमती 88.62 रुपये प्रति लिटरवर स्थित आहेत. तर मुंबईत पेट्रोलच्या किमती 107.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 96.19 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तसेच कोलकातामध्ये पेट्रोलच्या किमती 101.62 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 91.71 रुपये प्रति लिटर इतक्या आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमती 98.96 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 93.26 रुपये प्रति लिटर इतकी आहे. देशातील चार महानगरांची तुलना केली, तर पेट्रोल-डिझेलच्या सर्वाधिक किमती मुंबईत आहेत. 

देशातील प्रमुख शहरांतील दर : 

शहर  पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
दिल्ली 101.19 88.62
मुंबई 107.26 96.19
चेन्नई 98.96 93.26
कोलकाता 101.62 91.71
भोपाळ 109.63 97.43
रांची 96.21 93.57
बंगळुरु 104.70 94.04
पाटना 103.79 94.55
चंदिगड 97.40 88.35
लखनौ 98.30 89.02
नोएडा 98.52 89.21

पेट्रोल-डिझेलचे दर अर्ध्यावर येणार? मोदी सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता 

एकीकडे खाद्यतेल आणि डाळींच्या वाढत्या किंमती तर दुसरीकडे शंभरीपार गेलेले इंधनाचे दर, यामध्ये सामान्य माणसाची अवस्था केविलवाणी होत असताना एक आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. मोदी सरकार  पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. असं जर झालं तर देशातील पेट्रोलचे दर हे अर्ध्याने कमी होण्याची शक्यता आहे. 

सप्टेंबरमध्ये दोन वेळा घटल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती 

सप्टेंबर महिन्यात दोन वेळा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली. महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच, 1 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 15-15 पैसे प्रति लिटरची कपात केली होती. तसेच, 05 सप्टेंबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये 15-15 पैशांची घट झाली होती. म्हणजेच, या आठवडाभरता पेट्रोल-डिझेल 30-30 पैशांनी स्वस्त झाला आहे. 

जुलै महिन्यातील वाढ

जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये 16-16 वेळा वाढ झाली होती. 4 मेनंतर आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 11.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 09.14 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Embed widget