एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price : सलग दुसऱ्या दिवशी डिझेलच्या दरांत घट; आजचे दर काय?

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल -डिझेलच्या वाढणाऱ्या किमतींमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दिलासा. डिझेलच्या दरांत घट करण्यात आली असून पेट्रोलचे दर मात्र सलग 33 व्या दिवशीही स्थिर आहेत.

Petrol Price Today, Diesel Rate Latest Updates 19th August, 2021 : तेलं कंपन्यांनी आज म्हणजेच, गुरुवारसाठी पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. आज सलग 33व्या दिवशी पेट्रोलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र डिझेलच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी घट करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी आज डिझेलच्या किंमतीत 20 पैशांची घट केली आहे. म्हणजेच, आज सलग दुसऱ्या दिवशी डिझेल 20 पैशांनी स्वस्त करण्यात आलं आहे. यापूर्वी बुधवारी, म्हणजेच काल डिझेलच्या किमतींमध्ये 20 पैशांची घट करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या 33 दिवसांपासून पेट्रोलच्या किमतीत कोणताच बदल करण्यात आलेला नाही. मुंबईमध्ये आज पेट्रोलची किंमत 107.83 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 97.04 रुपये प्रति लिटर इतकी आहे. 

चेन्नई, पंजाबसह देशातील अधिक भागांत पेट्रोलनं शंभरी ओलांडली असून अनेक शहरांत पेट्रोलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. अनेक शहरांत डिझेलनंही शंभरी गाठली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये यापूर्वीच पेट्रोलनं शंभरी ओलांडली आहे. दिल्लीत आज पेट्रोलची किंमत 101.84 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 89.47 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर चेन्नईत आज पेट्रोलची किंमत 101.49 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 94.20 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

बंगळुरु, हैदराबाद आणि पुणे यांसारख्या महानगरांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरहून अधिक किमतीला विकलं जात आहे. दरम्यान, मालवाहतूक शुल्क आणि मूल्यवर्धित कर (व्हॅट) सारख्या स्थानिक करांच्या वेगवेगळ्या दरांमुळे इंधनाचे दर राज्यानुसार वेगवेगळे असतात.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी देशात सध्या ऐतिहासिक उंची गाठली आहे. अशातच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी, भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या 31 दिवसांपासून पेट्रोल किमतींमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. 

जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये 16-16 वेळा वाढ झाली होती. 4 मेनंतर आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 11.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 09.14 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर :

शहरं पेट्रोलची किंमत  डिझेलची किंमत 
दिल्ली  101.84 89.47
मुंबई  107.83 97.04
चेन्नई  102.49 94.02
कोलकाता  102.08 92.57
बंगळुरु  105.25  94.86
भोपाळ  110.20  98.26
चंदीगड  97.93  89.12
रांची 96.68 94.41
लखनौ  104.25  89.81

लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार? 

देशात इंधनदरवाढीच्या सत्राला ब्रेक लागून पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांनी जागतिक स्तरांवर तेलाच्या किमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूड ज्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाढ 77 डॉलर प्रति बॅरल झालं होतं, या किमती मागच्या पंधरवड्यात 10 टक्क्यांहून कमी होत 68.85 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. जर या किमती आणखी काही दिवसांसाठी 70 डॉलर प्रति बॅरलहून कमी राहिल्या, तर येणाऱ्या दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट होऊ शकते. 

पेट्रोलच्या दरांमध्ये मे महिन्यापासून 41 वेळा वाढ झाली 

पेट्रोलच्या दरांत चार मेनंतर 41 वेळा वाढ झाली. तर डिझेलच्या दरांमध्ये 37 वेळा वाढ झाली, तर दोनदा दरांमध्ये घट करण्यात आली. सलग तेलांच्या किमतींमध्ये होणाऱ्या वाढीमुळे मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, ओदिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब यांच्यासह 15 राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरनं महाग झालं आहे. डिझेल राजस्थान, ओदिशा आणि मध्यप्रदेशातील काही शहरांमध्ये 100 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. 

देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget