
Petrol Price Today : क्रूड ऑईलच्या दरांत मोठी घट; पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती जारी, झटपट चेक करा
Petrol-Diesel Price Today : भारतीय तेल कंपन्यांकडून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. तुमच्या शहरांतील आजचे दर काय?

Petrol-Diesel Price Today 11th August 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. आजही पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाही. तेल कंपन्यांकडून सातत्यानं तोटा होत असल्याचे अहवाल समोर येत आहेत. त्यामुळे सध्यातरी देशांत पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही दिलासा मिळणार नसल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून महाराष्ट्र वगळता देशातील इतर राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
कच्च्या तेलाचा लेटेस्ट दर काय?
जुलैमध्ये प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली गेलेल्या कच्च्या तेलाच्या किमतींत पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळत आहे. WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 91.47 डॉलरपर्यंत घसरली होती. तसेच, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 97 डॉलरवर घसरल्याचं दिसून आलं होतं. जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील शिंदे सरकारनंही पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपयांची कपात करून राज्यातील जनतेला दिलासा दिला होता. तर केंद्र सरकारनंही 21 मे रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कापत केली होती. तेव्हापासून देशात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपये प्रति लिटरनं स्वस्त झालं आहे.
महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
शहर | पेट्रोलच्या किमती | डिझेलच्या किमती |
मुंबई | 106.25 | 94.22 |
पुणे | 105 | 92 |
नागपूर | 106.03 | 92.58 |
नाशिक | 106.74 | 93.23 |
हिंगोली | 107.29 | 93.80 |
परभणी | 108.92 | 95.30 |
धुळे | 106.05 | 92.58 |
नांदेड | 108.24 | 94.71 |
रायगड | 105.96 | 92.47 |
अकोला | 106.05 | 92.55 |
वर्धा | 106.56 | 93.10 |
नंदुरबार | 106.99 | 93.45 |
वाशिम | 106. 37 | 93.37 |
चंद्रपूर | 106.14 | 92.70 |
सांगली | 105.96 | 92.54 |
जालना | 107.76 | 94.22 |
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
