(Source: Poll of Polls)
LPG Price : आजपासून LPG सिलेंडर 25 रुपयांनी महागला; मुंबईतील दर 834 रुपयांवर, तुमच्या शहरातील किंमत काय?
LPG Price Hike : विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये सरकारी तेल कंपन्यांनी 25 रुपयांची वाढ केली आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नईतील एलपीजी सिलेंडरच्या किमती काय?
मुंबई : दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागत आहे. अशातच आता पुन्हा एकदा विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी घरी वापरल्या जाणार्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ केली आहे. वाढलेल्या किमतींमुळे देशाची राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे दर आता 834 रुपयांवर पोहोचले आहेत. यापूर्वी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 809 रुपये होती. दरम्यान, एप्रिलमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमती 10 रुपयांनी स्वस्त झाल्या होत्या, त्यानंतर मे-जूनमध्ये एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नव्हता.
दिल्लीव्यतिरिक्त आजपासून कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडर 861 रुपयांना विकण्यात येणार आहे. तर मुंबईत विना अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 834 रुपये असणार आहे. चेन्नईत एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती 850 रुपयांवर पोहोचल्या आहेत.
यंदाच्या वर्षात किती वाढली किंमत?
दिल्लीमध्ये यंदाच्या वर्षी 1 जानेवारीपासून एलपीजी सिलेंडरची किमत 694 रुपये होती. 1 जुलै रोजी ही किंमत 834 रुपये झाली होती. म्हणजेच, यंदाच्या वर्षी 138 रुपयांची वाढ घरगुती गॅसच्या किंमतींमध्ये झाली आहे. 4 फेब्रुवारी रोजी किंमत वाढून 719 रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली होती. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी ही किंमत 769 रुपये आणि 25 फेब्रुवारी रोजी ही किंमत 794 रुपये करण्यात आली आहे. एक मार्च रोजी सिलेंडरची किंमत 819 रुपयांवर पोहोचली होती. एप्रिलमध्ये या किमतीत 10 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर आता जुलैमध्ये ही किंमत 834 रुपये करण्यात आली आहे.
तसेच दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 76.50 रुपयांनी वाढून 1550 रुपये झाला आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, एक जून रोजी दिल्लीमध्ये सिलेंडरची किंमत 122 रुपयांनी कमी करण्यात आली होती. सध्या कोलकाता, मुंबई, चेन्नईमध्ये 19 किलोच्या सिलेंडरची किंमत क्रमशः 1651.50, 1507, 1687.50 रुपये आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :