एक्स्प्लोर

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाचे दर घसरले? देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींतही घट होणार?

Petrol Diesel Price : देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमधील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.

Petrol Diesel Price in 30 October 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत (Crude Oil) घसरण झाली आहे. रविवारी, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 95.77 डॉलरपर्यंत घसरली आहे, तर WTI प्रति बॅरल 87.90 डॉलरवर पोहोचला आहे. अशातच देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. 

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ समान पातळीवर कायम आहेत. शनिवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल 87.46 डॉलरवर घसरल्याचं पाहायला मिळालं. तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 95.29 डॉलरपर्यंत घसरलं. ओपेक देशांनी उत्पादनात कपात केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून क्रूडच्या किमती वाढल्या आहेत. 

दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आहे. आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.35 रुपये, कोलकात्यात 106.03 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये आहे. डिझेलबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये, मुंबई 94.28 रुपये, कोलकाता 92.76 रुपये आणि चेन्नईमध्ये 94.24 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. 

सरकारी  तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारावर सकाळी 6 वाजता दररोज पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करतात. पेट्रोल किंवा डिझेलच्या दरांत काही बदल झाल्यास त्यांची अंमलबजावणी त्याच वेळी केली जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅटचे दर वेगवेगळे असल्यामुळे, प्रत्येक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखे नसतात.

देशातील महानगरांत सध्याचे दर काय? 

  • दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 
  • मुंबई : पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर 
  • चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

राज्यातील प्रमुख शहरांत दर काय?

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Heena Gavit : मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On North Kolhapur : उत्तर कोल्हापूरची जागा ठाकरे गटाला सोडली नाही है दुदैवbunty shelke Vs Pravin Datake :मध्य नागपुरात काँग्रेसचे बंटी शेळके विरुद्ध भाजपचे प्रवीण दटके लढतSalman Khan Threat Call   5 कोटी न दिल्यास धमकीचा मेसेज,  लॉरेन्स बिष्णोईच्या भावाच्या नावाने खंडणीची मागणीPolitical Poem Maharashtra : सोलापूरचे कवी अंकुश आरेकर यांची राजकीय कविता, सब घोडे बारा टक्के

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Heena Gavit : मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
मोठी बातमी : माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम, विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये मोठा हादरा
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
माझ्या मुलाला न्याय देणार होता, त्याचं काय झालं? लाटकरांच्या वडिलांचा शाहू महाराजांना सवाल, राड्याची इनसाईड स्टोरी
Satej Patil: मी कालच्या विषयावर पडदा टाकलाय! सतेज पाटील बॅक टू ट्रॅक, चेहऱ्यावर नेहमीचं हास्य ठेवत मीडियाला सामोरे गेले
मी कालच्या विषयावर पडदा टाकलाय! सतेज पाटील बॅक टू ट्रॅक, चेहऱ्यावर नेहमीचं हास्य ठेवत मीडियाला सामोरे गेले
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Embed widget