Petrol Diesel Price : रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या दरावर; जाणून घ्या राज्यातील इंधनाचे दर
Petrol-Diesel Price Today 28 February 2022 : रशिया युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत, जाणून घ्या तुमच्या शहरांतील दर काय?
Petrol Diesel Price on 28 February 2022 : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसून येत आहे. राजकारणासोबत अर्थकारणावरही याचे पडसाद उमटताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत आहे. तर, दुसरीकडे भारतात इंधन दर स्थिर आहेत. मागील 115 दिवसानंतरही देशभरात इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही दरवाढ केली नाही. राज्यातही इंधन दर स्थिर आहेत.
>> राज्यातील प्रमुख शहरातील इंधन दर
- मुंबई : पेट्रोल 110.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- पुणे : पेट्रोल 110.10 रुपये तर डिझेल 92.87 रुपये प्रति लिटर
- नाशिक : पेट्रोल 110.39 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.15 रुपये प्रति लिटर
- नागपूर : पेट्रोल 109.71 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.53 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर : पेट्रोल 109.70 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.52 रुपये प्रति लिटर
- अहमदनगर : पेट्रोल 109.55 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.35 रुपये प्रति लिटर
- अमरावती : पेट्रोल 111.55 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.74 रुपये प्रतिलिटर
- ठाणे : पेट्रोल 110.05 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.21 रुपये प्रति लिटर
देशातील चार प्रमुख महानगरांमधील इंधन दर स्थिर आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर 100 रुपयांखाली आहे. दिल्ली सरकारने व्हॅट आणि इतर करात कपात केल्याने दर शंभरी खाली आले आहेत.
>> देशात चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय?
> दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर
> मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर
> चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर
> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर
दरवाढीचा भडका उडणार?
देशात 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे देशात इंधन दर स्थिर आहेत. सध्या पाच राज्यात विधानसभा निवडणुका सुरू असल्याने दरवाढ टाळली जात असल्याची चर्चा आहे. या निवडणुका संपताच दरवाढीचा भडका उडण्याची भीती आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha