झारखंडमध्ये बाईकस्वारांसाठी पेट्रोल स्वस्त, पेट्रोलियम कंपन्यांकडून दिलासा नाहीच
Fuel Price today : इंधन कंपन्यांनी मागील दीड महिन्यांपासून ग्राहकांना कोणताही दिलासा दिला नाही.
Petrol Diesel Price Today : इंधन कंपन्यांकडून ग्राहकांना दिलासा देण्यात आला नाही. इंधनाच्या वाढलेल्या दरापासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारच आपले कर कमी करत आहेत. झारखंड सरकारने त्यांच्या राज्यातील नागरिकांना दिलासा देताना इंधन दरात 25 रुपयांनी कपात केली आहे. तर, दुसरीकडे इंधन कंपन्यांनी जवळपास दीड महिने आपले इंधन दर स्थिर ठेवले आहेत. भारतीय इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या दरात घट झाली तरी त्याचा फायदा ग्राहकांना मिळाला नाही.
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपये आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात दरात घट
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात नायमॅक्स आणि ब्रेंट क्रूडमध्ये किचिंत घट झाली. नायमॅक्स क्रूड 0.06 टक्के घट झाली असून 76.50 डॉलर प्रति बॅरल इतक्या किंमतीवर व्यवहार सुरू आहे. त्याशिवाय ब्रेंट क्रू़ड ऑईलमध्ये 0.05 टक्क्यांची घट झाली असून 79.18 डॉलर प्रति बॅरल इतका दर आहे.
झारखंडमध्ये इंधन दरात कपात, पण...
इंधन दरवाढीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने करात कपात करत पेट्रोल, डिझेलचे दर काही प्रमाणात कमी केले. केंद्राच्या या निर्णयानंतर काही राज्यांनी आपल्या करातही कपात करत इंधन दर आणखी कमी केले. झारखंडमध्ये देखील हेमंत सरकारने दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदर पेट्रोलचे दर तब्बल 25 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंड सरकारने मध्यमवर्ग, गरिबांसाठी दुचाकीसाठी कमाल 10 लीटर इंधन खरेदी करता येणार. इंधन खरेदी केल्यानंतरचे इंधन कपातीची रक्कम ही थेट बँक अकाउंटमध्ये येणार आहे. ही योजना 26 जानेवारीपासून सुरू होणार आहे.